चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत, ३७, ३८/ बी, वैष्णव पार्क, बेलतरोडी रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी ताराचंद गिरभारीलाल शर्मा, वय ४५ वर्षे हे ठेकेदारीचे काम करतात, त्यांनी घरमालक नामे प्रशांत नत्थ्यूजी शेंडे रा. प्लॉट नं. ४३, खसरा नं. १६/२/४, मौजा चिंनभवन, नागपूर यांचे प्लॉट वर घरबांधकाम घेतल्याने, दिनांक ०१.०३. २०२४ चे ०६.०० वा. ते दि. ०८.०३.२०२४ चे १०.३० वा. चे दरम्यान, घर बांधकामासाठी लागणारे लोखंडी पाईप व लोखंडी सेट्रींग प्लेट किंमती अंदाजे १,५५,०००/- रू. चा मुद्देमाल आणुन ठेवला असता, नमुद मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला,

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे बेलतरोडी येथे पोउपनि, गोरडे यांनी आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.द.वि, अन्वये गुन्हा दाखल केला, तात्काळ दखल घेवून संशयावरून आरोपी नामे भुपेन्द्र सेवकराम बगारे, वय ३० वर्षे, रा. कटंगी, जि. बालाघाट (म.प्र.) यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने त्याचे ईतर साथिदार सोबत संगणमत करून चोरी केल्याचे कबुल केले, आरोपी भुपेन्द्र बगारे यास अटक केली असुन, त्याचे ईतर साथीदार पाहीजे आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

Tue Mar 12 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे मानकापूर हदीत राहाणाऱ्या २५ वर्षीय महीला फिर्यादीचे संमती शिवाय त्यांचे इंस्टाग्राम आयडीवर आरोपी नामे अक्षय दिगांवर बहादे, वय ३२ वर्षे, रा. पार्वती नगर, अजनी, नागपूर याने ईलेक्ट्रॉनीक माध्यमातुन बारकाईने लक्ष ठेवुन, पाठलाग केला, दिनांक ०८.०३.२०२४ से १८.०० वा. चे सुमारास, आरोपीने फिर्यादीस फोनवरून शिवीगाळ करून, मनास लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच, फिर्यादीचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com