अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत प्रबोधनपर कार्यशाळा

यवतमाळ :- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व सुधारीत अधिनियम या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रबोधनपर कार्यशाळा सामाजिक न्याय भवन येथे घेण्यात आली.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, यशदाचे मास्टर ट्रेनर सुभाष केकान, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर, सचिन गिरमे, रोहीत अवचरे तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी कऱ्हाळे तसेच 300 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारीत अधिनियम 2016 या विषयावर मागदर्शन केले. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत तालुकास्तरावर समिती गठीत करावी व कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कारवाई करावी, असे निर्देश दिले.

प्रास्ताविकात भाऊराव चव्हाण यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व सुधारीत अधिनियम या विषयाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये आयपीएस अधिकारी रजनीकांत चिलमूला, सुभाष केकान यांनी देखील मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी वैजने यांनी कायद्यांतर्गत कशाप्रकारे अंलबजावणी केली जाते याबाबत माहिती दिली. बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर यांनी बार्टीमार्फत राबविण्या़त येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. दुसऱ्या सत्रात तज्ञ व्याख्याते सुभाष केकान यांनी या कायद्याअंतर्गत भारतीय संविधान कलम 14 अन्वये माहिती दिली.

या कार्यशाळेकरीता उपविभागीय अधिकारी, पोलिस अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसिलदार, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस कर्मचारी, सवित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, नागरी हक्क संरक्षण अधिनियम शाखेत काम करणारे कर्मचारी, जिल्हा दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीतेसाठी समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी, समता दूत यांनी सहकार्य केले. संचलन प्रा.कमलदास राठोड यांनी केले तर आभार समतादूत रुपेश वानखेडे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निधी मागणीच्या न्यायिक हक्कासाठी जिल्हाधिकारी ला निवेदन सादर 

Fri Mar 8 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत येरखेडा ला शासनाने नागरी सुविधा अंतर्गत कोणत्याच प्रकारची निधी दिला नाही. याप्रकारे शासन लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करून ग्राम पंचायत वर अन्याय करून राहिले असल्याचे सामूहिक निवेदन नागपूर . जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी ,येरखेडा ग्रा प सरपंच सरिताताई रंगारी तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!