– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण ची कारवाई
अरोली :- पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत चोखाळा शिवार येथील ७२ किमी अंतरावर दिनांक १३/१०/२०२३ चे सायंकाळी ०६.०० वा. ते दिनांक १४/१०/२०२३ चे सकाळी १०.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे सुनिल नामदेव डोंगरे, वय ४५ वर्ष, रा. चोखाळा ता. रामटेक यांचे शेताचे धुर्यावर ठेवलेले पाठबंधारे विभागाचे लोखंडी तराफे कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने रिपोर्ट वरून पोस्टे अरोली येथे अप क्र. ३३९ / २३ कलम ३७९ भादंवि चा गुन्हा नोंद करून तपासात होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असतांना दिनांक १६/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त माहीतीगाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली त्यावरून पथकाने चोखाळा शिवार येथे सापळा रचुन आरोपी नामे- १) समीर युनिस पठान, वय २१ वर्ष, रा. अरोली ता. मौदा जि. नागपूर २) बादल कैलास बर्वे, वय ३२ वर्ष, रा. अरोली ता. मौदा ३) मनोज राजेंद्र डोंगरे, वय ३४ वर्ष, रा. चोखाला ता. रामटेक यांना ताब्यात घेवून पोस्टे अरोली येथील अप क्र. ३३९ / २३ कलम ३७९ भादवि गुन्हयात चोरी गेलेले लोखंडी वॉटर स्टॉपर (तराफे याबाबत सखोल विचारपूस केली असता आरोपीतांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांचेवर संशय बळावल्याने अधिक विचारपुस केली असता त्यांनी लोखंडी वॉटर स्टॉपर ( तराफे) चोरी केल्याचे कबुल केले. त्यांचे ताब्यातुन ०३ लोखंडी वाटर स्टॉपर (तराफे प्रत्येकी ३००० /- रू. प्रमाणे एकूण किंमती ९०००/-रू. व गुन्हयात वापरलेली टाटा एस क्र. MH-31/ EN-0625 किंमती ४,५०,०००/-रु. असा एकुण ४,५९,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन अरोली येथील अप क्र. ३३९ / २३ कलम ३७९ भादंवि गुन्हा उपडकीस आणला आहे. जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रियेकरीता पोलीस स्टेशन अरोली यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई नागपुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार रोशन काळे, नितेश पिपरोदे, उमेश फुलवेल, शंकर मडावी, प्रमोद भोयर, विपीन गायधने, चालक पोलीस हवालदार अमोल कुधे यांचे पथकाने केली आहे.