इलेक्ट्रीक मोटार मशिनी चोरी करणारे आरोपी उमरेड पोलीसांच्या जाळयात

उमरेड :- पोस्टे उमरेड अंतर्गत मौजा एमआयडीसी वैभव लक्ष्मी रोलींग मिल येथे कुकर बनविण्याच्या मशिनीला लागलेल्या अमरीत सुपर पॉवरची ०३ मोटार क्र. १) ०५ एच पी किं. ६०००/- रू २) २ एचपी ची कि, २००० ३) २ एचपी ची कि. २००० रु ४) कलसी कंपनीची ३ एचपी किंमती ४०००/- रू च्या इलेक्ट्रीक मोटार मशीनी एकुण १४०००/-रु. च्या कोणत्त्यातरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली आहे. अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पोस्टे उमरेड येथे कलम ३३४(१), ३०५ (अ) विएनएस अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

पोस्टे उमरेड येथील तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, काही इसम मोटरसायकलवर एमआयडीसी परीसरात संशयीतरीत्या फिरत आहे. अशा माहिती वरून एमआयडीसी परीसरात काही इसम बंद दुध डेअरी समोर मोटरसायकलवर दिसुन आले. त्यांना विचारपुस केली असता उडवाउडविचे उत्तरे देत होते. म्हणुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांना नाव गाव विचारले असता आरोपी नामे ०१) अमोल नरेश डडमल वय २६ वर्ष, ०२) अक्षय किसन डडमल, वय २३ वर्ष, ०३) विनोद नामदेव डडमल वय ३४ वर्ष, ०४) योगेश गुलाब डडमल वय २६ वर्ष, ०५) विशाल दिलीप वाकडे, वय २९ वर्ष, सर्व रा. कुंभारी ता. उमरेड जि. नागपुर असे सांगितले. त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेल्या कलसी कंपनीची ३ एच पी एक मोटार व अमरीन कंपनीची ०२ एच पी च्या ०२ मोटार व ०५ एचपी भी ०१ मोटार अशा एकूण ०४ मोटारी किंमती १४,०००/-रू. व आरोपीच्या ताव्यातील होंडा अॅक्टीवा ६ जी क्र. एम एच-४०/सि व्ही ६६५३ किंमती १०००००/- रू. २) पेंशन प्रो कंपनीची काळया रंगाची क्र. एम एच-४०/एक्स-९२७५ किंमती ४०,०००/-रू. ३) पल्सर एन एक्स १६० क्र. एमएच-४०/सिपी -९७५२ किंमती १,३०,०००/-रू. असा एकूण २८४०००/- रू बा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे उमरेड येवील ठाणेदार पोनि अनिल राउत, सपोनि भाग्यश्री कुलकर्णी, पोहवा प्रदीप चवरे, रमेश खरकाटे, भागवत गुटटे, संदीप गुट्टे, पोहवा राधेशाम कांबळे, पोहवा विष्णु जायभाय, पोअं गुड्डु सोनवाने, प्रफुल क्षिरसागर, उमेश वांत यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मौजा उमठा पारधी बेडा येथील हातभ‌ट्टी चालकांवर पोलीसांची रेड कारवाई

Mon Sep 16 , 2024
– जलालखेडा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची संयुक्त प्रतिबंधक कारवाई जलालखेडा :- पोलीस ठाणे जलालखेडा हद्दीतील मौजा उमठा, पारधी बेडा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोलीस स्टेशन जलालखेडा हद्दीतील मौजा उमठा, पारधी वेडा येथे सुरू असलेल्या मोहाफुल गावठी दारू भ‌ट्टीवर रेड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!