चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- फिर्यादी उज्वल रमेश गेडाम वय ४० वर्ष रा. गोकुलपेट, बौद्ध विहारा जवळ, अंबाझरी नागपूर यांचे घराचे बांधकाम पो. ठाणे अंबाझरी हद्दीत प्लॉट न. २६६, धरमपेठ, शिवाजी नगर, नागपुर येथे सुरू असून त्यांनी घराचे बांधकामा करीता लोखडी सडाखी आणल्या होत्या. आरोपी १) शंकर देवाजी चौधरी वय ३२ वर्ष २) गजानन राजु शनेश्वर वय २४ वर्ष दोन्ही रा. पांढराबोडी, अंबाझरी, नागपूर यांनी दि. १३.०५. २०२३ चे २०.३० वा. चे सुमारास फिर्यादीने उघड्या भागात ठेवलेल्या साहित्या पैकी आठ व दहा एमएमच्या लोखंडी सडाखी किमती एकूण ५,०००/- रु या मुद्देमाल बांधुन घेवुन जात असता दिसल्याने तेथील गार्ड याने आरडाओरड केली असता जमलेल्या लोकांनी पाठलाग करून आरोपींना बास्केट बॉल ग्राउंड जवळ, धरमपेठ येथे मुद्देमालासह पकडले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे अंबाझरी येथे पोउपनि मात्रे ९८५०९११६६६ यांनी आरोपी विरुध्द कलम ३७९, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच नागपूर ने रक्तदानातुन दिला मानवसेवेचा संदेश

Mon May 15 , 2023
नागपुर :- आय.जी.एम.सी. मेयो रक्तपेढी नागपूर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच व आकाशझेप फाउंडेशन रामटेक यांचा सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी श्याम आस्करकर महाराष्ट्र नाभिक मंडळ प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र, गणपत चौधरी जिल्हाध्यक्ष नागपूर, विष्णू  ईजनकर जिल्हा कार्याध्यक्ष, डॉ अग्रवाल रक्तपेढी प्रमुख इन्चार्ज, डॉ सागर  Bto, चेतन मेश्राम , वंदना भगत, प्रितम  मेश्राम संचालक करुणा फाऊंडेशन, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com