वेलतूर :- पोलीस स्टेशन वेलतूर येशील स्टाफ पोलीस स्टेशन वेलतूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, मौजा म्हसली येथे ट्रकद्वारे अवैधरीत्या विनारॉयल्टी रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता स्टाफसह मौजा म्हसली येथे ट्रक क. एम एच ४० सी एन- ७११६ वा चालक आरोपी नामे मोहन हरिसींग वलके वय ३४ वर्ष रा. जुना बगडगंज नागपुर याने आपल्या ताब्यातील वाहनात ०९ ब्रास रेती अंदाजे ४५,०००/- रू याने मालकाचे सांगणेवरून विनापरवाना अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातून ०९ ब्रास रेती कि, ४५,००० रू. व ट्रक कि. ३२,००,०००रु. असा एकुण ३२,४५,००० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली. आरोपीविरूद्ध कलम ३०३(२), ४९ भा.न्याय सहीता ४८ (७), ४८(८) म.ज.महसूल संहिता १९६६. सह. कलम ४, २१ खानी, आणी खनिजे (विकास आणी नियमन) अधि. १९५७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे वेलतूर येथील ठाणेदार सपोनि सतिश पाटील, नापोशि मनिराम भुरे, पोअं. अविनाश मस्के यांनी पार पाडली.