नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. २२५, श्रीनगर, एम्प्रेस मिल सोसायटी, अजनी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे आमीर सुनिल झोडापे, वय ३३ वर्षे, यांचे स्वतःचे घरी ‘केझ गेमींग नेशन व नेट कॅफे’ नावाचे शॉप असुन त्यांनी रात्री २२.०० वा. शॉप बंद करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे शॉपचे शटरचे लॉक तोडुन ते अर्थ उपहुन आत प्रवेश करून, शॉप मधील प्ले स्टेशन एस पी-५, एस पी-४, एस पी-३, वेगवेगळया प्ले स्टेशनचे गेम रिमोर्ट, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकुण किंमती अंदाजे ७५,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५, ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी नामे जयेश मोरेश्वर सत्तीकोसरे, वय २१ वर्षे, रा. फ्लॉट नं. ४६, गृहलक्ष्मी सोसायटी, पारडी, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीस अधिक सखोल विचारपूस केली असता, त्याने पोलीस ठाणे कळमणा हद्दीत सुध्दा गेमींग झोन व नेट कॅफे येथे चोरी केल्याचे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन पोलीस ठाणे अजनी येथील दाखल गुन्हयातील प्ले स्टेशन एस पी-५, एस पी-४, एस पी-३, वेगवेगळ्या प्ले स्टेशनचे गेम रिमोर्ट, मोबाईल फोन एक चेतक दुचाकी व इतर साहित्य, तसेच पोलीस ठाणे कळमणा येथील दाखल गुन्हयातील प्ले स्टेशन एस पी-५, एस पी-४, एस पी-३, वेगवेगळ्या एले स्टेशनचे गेम रिमोर्ट, दोन मोबाईल फोन, हार्डडीक्स, मेमोरी कार्ड, गेम सिडी, एक अॅक्टीव्हा गाडी व इतर साहित्य, असा एकुण किंमती अंदाजे ३,५०,७००/- रू. चा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करून एकुण दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीस मुद्देमालसह पुढील कारवाई करीता अजनी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांचोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा, पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि, कमलाकर गड्डीमे, पोउपनि, अविनाश जायभाये, पोहवा, सुनिल ठवकर, रोशन तिवारी, अजय यादव, अतुल चाटे, देवेंद्र नवघरे, पुरुषोत्तम काळमेघ, नापीअं. नितीन वर्मा व प्रकाश राजपल्लीवार त्यानि पथकाने केली.