नागपूर :- दिनांक २०/०८/२०२३ चे २१.०० वा. दरम्यान पिडीता / फिर्यादी ही १० व्या वर्गात शिक्षण घेत असुन यातील आरोपी नामे आयान अजिज शेख, वय १८ वर्ष रा. वार्ड क्र. ०४ बुट्टीबोरी ता. जि. नागपुर हा फिर्यादीचे शाळेसमोर व घरासमोर येवुन फिर्यादीचा पाठलाग करून फिर्यादी सोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो यातील फिर्यादी वय १५ वर्ष ही दिनांक २०/०८/२०२३ रात्री २१/०० वा. सुमारास घरातील कचरा फेकायला घराचे बाहेर गेली असता आयान शेख हा तिचे घरासमोर आला व फिर्यादीस बघुन त्याने म्हटले की तु माझे सोबत बोलत का नाही असे म्हणाला असता फिर्यादी त्याला म्हणाली की मला तुझे सोबत काही बोलायचे नाही व तु माझा पाठलाग करणे बंद कर तेव्हा फिर्यादीची आई ही घराबाहेर आली असता आईने आयान यास तु माझे मुली सोबत कशाला बोलत आहे असे म्हटले असता आयान हा तेथून धावत निघुन गेला…. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. बोरी येथे आरोपीविरुध्द ३५४ (४) भादवी सहकलम पोस्को ११ (४), १२ कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेजिवाड या करीत आहे.