नागपूर – दिनांक २५.०४.२०२३ रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी गजानन उकंडराव नेहारे त्यांच्या आयसर चार चाकी गाडी, मॉडेल १११०, कत्थ्या रंगाची क्र. एम. एच ४० ए.के ३२४५ मध्ये वेगवेगळया साईजचे पि.व्ही.सी पाईप, दोन प्लास्टीक टंकी १००० लिटरच्या, ६ प्लास्टीक ड्रम असे लोड करून वैष्णोदेवी चौकातुन प्रजापती चौकाकडे जात असता पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत हल्दीराम बगल्याचे समोरील रोडवर एका कळया रंगाचे अॅक्टीव्हा गाडीवरील दोन अनोळखी इसमाने मागुन येवुन फिर्यादीची गाडी थांबविली व हार्न का वाजविला या कारणावरून शिवीगाळी करून त्या पैकी एकाने फिर्यादीस खाली उतरविले व फिर्यादीस शिवीगाळी करून फिर्यादीची गाडी व मोबाईल जबरीने हिसकावुन घेवुन गेले. फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस ठाणे लकडगंज येथे कलम ३९२, ३४ भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा यनिट क. ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून व तांत्रीक तपास करून गुन्हातील आरोपी जितु उर्फ जितेन्द्र श्रीधर मुळे वय २८ वर्ष रा. भवानी मंदीर जवळ, पारडी २) शेख मुस्तकीन उर्फ टिंम्बा वल्द शेख रहमान वय २३ वर्ष रा जंक्शन बार मागे, आदर्श नगर, नंदनवन नागपुर यांना खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले. आरोपींने वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन १) आयशर वाहन क्रमांक MH 40 AK 3245 किंमत ५,००,००० /- रू. २) पारस कंपनीचे प्लास्टीकचे पाईप, फिटींग, घमेला, बकेट, कुंडी, व वाटर टॅन्क किंमती ३,४२,१५३ /- रू. ३) सेरा कंपनीचे सॅनेटरी किंमती ३५,२९३/- रू. ४) एक निळया रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल किंमती १५०००/- रू. ५) एक अॅक्टिव्हा गाड़ी क. MH 49 BV 4479 किंमत ८०,००० /- रू. ६) गोल्डन रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल फोन किंमती १५०००/- रूपये असा एकुन ९,८७,४४६ /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील तपास कामी लकडगंज पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज सिडाम, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि महेश सागडे, सपोनी. पवन मोरे, पोउपनि मधुकर कोठाके, पोउपनि बलराम झाडोकर, सफौ. सतीश पांडे, पोहवा. दशरथ मिश्रा, श्याम अंगथुलेवार, विजय श्रीवास, आनंद काळे, अनिल बोटरे, मिलींद चौधरी, फिरोज शेख, पोअ रविन्द्र करदाते, दिपक लाखडे, चंद्रशेखर रार्घोते, अनंता क्षीरसागर यांनी केली.