नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत, प्लॉट नं. ०५, बालाजी नगर विस्तार येथे राहणारे फिर्यादी रमेश श्रीधर नेहते, वय ८० वर्षे, हे व त्यांची पत्नी वॉकींग करून घरी परत आले व घरात गेले असता, अचानक एक अनोळखी २५ ते ३५ वयोगटातील आरोपी याने फिर्यादीचे घरात येवुन मुख्य दाराची कडी लावुन बंद केली व एका लोखंडी हातोडीने फिर्यादीचे डोक्यावर प्रहार केला, तसेच फिर्यादीची पत्नी मध्ये आली असता, त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र किंमती ६०,०००/-रू ने जबरीने हिसकावून घेतले, व दार उघडून पळून गेला. जख्मी फिर्यादी यांचा उपचार करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३९४, ४५२, भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा, युनिट क. ४ वे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयातील आरोपी हा हिंगणा सि.आर.पी. एफ कॅम्प परिसरात फिरत आहे अशा खात्रीशीर गोपनीय माहिती वरून तसेच तांत्रिक तपास करून, सि.आर.पी. एफ कॅम्प हिंगणा परिसरात सापळा रचुन दि. ३०.०३.२०२४ चे १८.०० वा. लतामगेशकर हॉस्पीटल जवळ, आरोपी नामे देवेंद्र नारायण सोनसारवे, वय ३६ वर्ष, रा. प्लॉ. नं. २४, वसंत नगर, अजनी. ह.मु. टाईप-२ क्वॉ. नं. १८२, सि.आर.पी.एफ कॅम्प, हिंगणा, नागपूर यास ताब्यात घेतले. आरोपीची विचारापुस केली असता, त्याने वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली हिरोहंक कंपनीची मोटर सायकल क. एम.एच. ४० ए.एन. ०७९० किंमती अंदाजे एकूण ८०,०००/- रू. ची तसेच मोटोरोला कंपनीचा मोबाईल किंमती १०,०००/-रू चा जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपी याने गुन्हा करतांना तसेच गुन्हा केले नंतर नागपुर शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांचा वापर केला तसेच आरोपीने वेळोवेळी स्वतःची वेशभुषा बदलवून स्वतःची ओळख लपविली. पोलीसांनी नागपुर शहरातील जवळपास १५० सि.सी.टी.व्ही. कॅमेरांची फुटेज ची तपासणी करून व बुध्दीकौशल्याचा वापर करून आरोपीची कोणतीही माहीती नसतांना त्याचे नाव व पत्ता निष्पन्न केला व त्यास ताब्यात घेवुन अतिसंवेदनशिल गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणला, आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करीता अजनी पोलीसांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी डॉ. रविंद्रकुमार सिंघल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, अश्वती दोरजे, सह पोलीस आयुक्त, संजय पाटील, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, निमीत गोयल, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन), डॉ. अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, पोनि रमेश ताले, पोउपनि अविनाश जायभाये, पोहवा सुनिल ठवकर, रोशन तिवारी, अतुल चाटे, नापोअं. चंद्रशेखर राघोर्ते, धिरज पंचभावे, देवेंद्र नवघरे, स्वप्निल अमृतकर, संदीप मावलकर, सत्येंद्र यादव यांनी केली.