नागपूर :-दिनांक १२.०५.२०२३ वे १९.०० ते २०.१५ वा. चे दरम्यान पोलीस ठाणे एम.आय.डी.सीत राहणाऱ्या ३५ वर्षीय फिर्यादी यांची १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिची आरोपी नामे अंकीत उर्फ प्रज्वल हिरालाल पाटील वय २० वर्ष रा. एम.आय.डी.सी. नागपूर यांचे सोबत ओळख होवुन त्यांचात मैत्री झाली. आरोपीने फिर्यादीची मुलगी हिला पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हदीत एकापाण्याचे टाकीजवळ घेवून गेला व तिला जबरदस्तीने धमकी देवून पाण्याचे टाकीवर नेवून तिचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. याबाबत कोणाला काहिही सांगीतल्यास तिचे आई वडीलांना मारण्याची धमकी दिली. पिडीत मुलीची प्रकृती खराब झाल्याने फिर्यादीने मुलीला विश्वासात घेवून विचारले असता मुलीने फिर्यादीस वरील घटनेबाबत सांगीतले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तारीवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी येथे पोउपनि रामलोड यांनी आरोपीविरुध्द कलम ३६६ (अ), ३७६, ३७६ (३), ३७६ (२) (जे), ५०६, भा.दं.वि. सहकलम ३, २४. ८. पोक्सो कायदाअन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.