घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, एकूण ३ गुन्हे उघडकीस

नागपूर :- पोलीस ठाणे पारडी हद्दीत प्लॉट नं. १७८, डी/५, भवानी नगर, पारडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सुरेश शंकरराव कटाईन वय ६८ वर्ष हे त्यांचे राहते पराला कुलूप लावुन चंद्रपूर येथे गेले असता कोणीतरी अज्ञात आरोपीने घराचे मुख्य दाराचे लॉक तोडुन घरात प्रवेश करून आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १,०५,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वो अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हयाने समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी १) आदीत्त्व उर्फ गब्बर विकास बब्बर वय २३ वर्ष रा. नागार्जुन कॉलोनी, जरीपटका, नागपूर यास त्याचे इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालकासह ताब्यात घेतले. आरोपीला विचारपूस केली असता, आरोपीने नमुद घडफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली, तसेच दिनांक १४,०४,२०२४ चे ०८.०० वा. ते दि. १५.०४.२०२४ चे २१.०० वा. चे दरम्यान प्लॉट नं. ३०, शिवम नगर, पारडी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी रितीक झुलेलाल पटले वय २२ वर्ष यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन सोन्या-चांदीचे दागिने व रोख १०,०००/- रू असा एकुण ३७,५००/- रू चा मुद्देमाल चोरून नेणारे आरोपी मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहीद वय २२ वर्ग रा. सिंधीचन, मोठा ताजबाग, नागपूर यास व त्याचे एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता, त्यांनी नमुद घरफोडी केल्याची कबुली दिली. अशाच प्रकारे पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत मिरे ले-आउट, पॉट नं. ३८. न्यू गिनी वर्ल्ड नावाचे ऑटो मोबाईल दुकानात घरफोडी करणारे आरोपी क. १) शेख सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूख वय २० वर्ष २) सोहेल कसाई ईकबाल कुरेशी वय १९ वर्ष दोन्ही रा. आझाद कॉलोनी, मोठा ताजबाग, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचा साधिदार पाहिजे आरोपी क. ३) सोहेल भांजा रा. मोठा ताजबाग, नागपूर याचे सोबत संगणमत करून वरील ऑटोमोबाईल दुकानात चोरी केल्याची कबुली दिली, नमुद तिन्ही घरफोडीने गुन्हयातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींने ताब्यातुन सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी वाहन व रोखख रक्कम असा एकुण ३,७८,६६०/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी पारडी व नंदनवन पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, पोलीस सह. आयुक्त नागपूर शहर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि, मुकुंद ठाकरे, पोउपनि, मधुकर काठोके, सफौ. दशरथ मिश्रा, सतिश पांडे, पोहवा, संतोषसिंग ठाकुर, विजय श्रीवास, पोअं. जितेश रेड्डी, दिपक लाकडे, दिपक दासरवार, विशाल रोकडे व प्रमोद देशभ्रतार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज दिक्षाभुमी से मेत्ता शांती यात्रा का शुभारंभ

Sat May 18 , 2024
– मानव-मानव मे मैत्री शांती की ऊर्जा निर्माण करे – यशवंत तेलंग नागपूर :- संस्था के अध्यक्ष यशवंत तेलंग की अध्यक्षता में आज दिनांक १८/०५/२०२४ जेष्ठ समाज सेवक कृष्णदत्त चौवे इनके शुभ हस्ते दिक्षाभूमी तथागत गौतमबुध्द तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनके पुतलों को भव्य पुष्पमाला अर्पण कर उनकेही शुभहस्ते पंचशील ध्वज बताकर मेत्ता शांती यात्रा का आरंभ किया गया उस वक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com