नागपूर :- पोलीस ठाणे धंतोली हद्दीत प्लॉट नं. ५. विकास नगर, साई मंदीर मागे, वर्धा रोड, धंतोली, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे पुरूषोत्तम रामचंद्र भेदरकर वय ८५ वर्ष हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह गोवा येथे गेले होते. फिर्यादीचे वाहन चालक सकाळी घर चेक करण्यास आले असता, दाराचा कडी-कोंडा व कुलूप तुटलेले होते. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे दाराचे कडी-कोंडा व कुलूप तोडुन घरात प्रवेश करून गोदरेज आलमारीचे लॉक तोडुन आलमारीतील रोख १०,००,०००/- रू. व सोन्याचे दागिने नेकलेस, मंगळसुत्र, मोहनमाळ असा एकुण किंमती अंदाजे १३,००,०००/- रू या मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी घरी परत आलेवर दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५, ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून गुन्हयातील आरोपी सतीश रतनलाल गौर वय २५ वर्ष रा. ज्योती नगर, खदान, तहसिल, ह.मु. ठाकरे ले-आउट, कळमणा, नागपूर याम ताब्यात घेवुन सखोल विचारपूस केली असता, आरोपीने वरील चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याने पोलीस ठाणे वाडी, गणेशपेठ व हुडकेश्वर होतु सुध्दा घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीला पुढील कारवाईस्तव धंतोली पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा युनिट क. ३ चे पोनि, मुकुंद ठाकरे, पोउपनि, नवनाथ देवकाते, सफी. ईश्वर खोरडे, मिलींद चौधरी, पोहवा. मुकेश राऊत, अमोल जासुद, विनोद गायकवाड, अनुप तायवाडे, पोअं. संतोष चौधरी, मनिष रामटेके व अनिल बोटरे यांनी केली.