नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. ३२, मिसाळ ले-आउट, जरीपटका, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे विशाल पंजाबराव ठवडे, वय ४० वर्षे, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह कार्यकमा करीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे दाराचे कडी कोंडा तोडुन, घरात प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख १३,५००/- रू. सोन्याचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे ५६,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१ (४) भा. न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपासावरून आरोपी नामे १) मोहम्मद अरशद सादीक शेख, वय २० वर्षे, रा. वासीन प्लॉट, माढा ताजबाग, नागपूर २) हर्षल ज्ञानेश्वर गवाडे वय २४ वर्ष रा. प्लॉट नं. ८६, सर्वश्री नगर, दिघोरी, नागपूर ३) शेख सुलतान शेख समशेर वय २२ वर्ष रा. यासीन प्लॉट, माठा ताजबाग, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्हा त्यांचा साथिदार पाहिजे आरोपी क. ४) अजय संजय सारवन वय १९ वर्ष रा. १६०, पि.डब्लू.डी क्वॉर्टर, सिव्हील लाईन, नागपूर याने सह संगणमत करून केल्याची कबुली दिली. आरोपींना अधिक विचारपूस केली असत्ता, त्याने वरिल गुन्हया व्यतीरिक्त पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत सुध्दा घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातून सोन्याची लगडी, डोरले, तिन मोवाईल फोन, अॅक्टीव्हा क. एम.एन ३१ ई.डब्लू २६०९ व एक ग्रे रंगाची अॅक्टीव्हा ६ जी व रोख १,२००/-रू. असा एकुण किंमती अंदाजे २,८३,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालसह पुढील कारवाई करीता जरीपटका पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. कमलाकर गड्डीमे, पोउपनि, वैभव बारंगे, पोहवा, मेहेन्द्र करीमवार, नाजीर शेख, पुरुषोत्तम जगनाडे, युवानंद कडु, पोअं. महेश काटवले, लक्ष्मण कळमकर यांनी केली.