जाळपोळ तसेच खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- पोलीस ठाणे धंतोली हद्दीत फुल मार्केट, जानकी कॉम्प्लेक्स जवळ, राहणारे फिर्यादी नामे वेदांत विकास ढाकुलकर, वय २४ वर्ष, हे घरी हजर असतांना आरोपी १) मृणाल मयूर गजभिये वय २८ वर्ष रा. आनंद नगर, सिताबर्डी, नागपूर २) अमन अनिल मेश्राम वय २९ वर्ष रा. सोमवारी क्वॉर्टर, सक्करदरा, नागपूर ३) निखील संतोष सावडीया वय २४ वर्ष रा. टेकडी लाईन, सिताबर्डी नागपूर यांनी संगणमत करून फिर्यादीचे घरा बाहेर असलेले करिश्मा गाडी मधुन पेट्रोल काढले व कापडावर टाकुन आग लावुन फिर्यादीचे घरावर फेकले, तसेच आरोपींनी शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देवुन निघुन गेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे आरोपीविरूध्द कलम ४३६, ५०४, ५०६(ब), ३४ भा.द. वि, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दिनांक १७,०५,२०२४ चे ०६,३० वा. ते ०७,०० वा. चे दरम्यान, पोलीस ठाणे धंतोली हद्दीत फुल मार्केट, प्लॉट नं. ३६, जानकी टॉकीज मागे, राहणारे फिर्यादी नामे यश किशोर तिवारी, वय २८ वर्ष, हे घरी हजर असतांना आरोपी १) मृणाल मयूर गजभिये वय २८ वर्ष रा. आनंद नगर, सिताबर्डी, नागपूर २) अमन अनिल मेश्राम वय २९ वर्ष रा. सोमवारी क्वॉर्टर, सक्करदरा, नागपूर ३) निखील संतोष सावडीया वय २४ वर्ष रा. टेकडी लाईन, सिताबर्डी नागपूर यांनी संगणमत करून फिर्यादीचे घराचे दाराला लाथाने मारून फिर्यादीस अश्लिल शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली व फिर्यादीस आरोपी क. १ याने “तू मेरे लिये एम.डी बेचने का काम कर, नहीं करेंगा तो तूझे मेरे को १०,०००/- रू महिना देना पड़ेगा” असे म्हटले फिर्यादीने खिडकीतून पाहिले असता आरोपी क. १ याचे हातात अग्नीशस्व दिसल्याने फिर्यादी बाहेर निघाले नाही. नंतर आरोपी तेथून निघून गेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे मपोउपनि गयकर ९६०४८९६१२० यांनी आरोपींविरूध्द कलम ३८६, २९४, ५०६(ब), ३४ भा.द.वि. सहकलम ३/२५ भा.ह. का अन्वये गुन्हा दाखल केला,

धंतोली पोलीसांनी मिळालेल्या माहितीवरून त्वरीत दखल घेवुन आरोपींचा शोध घेवुन वरील तिन्ही आरोपी यांना जाळपोळीचे गुन्हयात अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राणांतीक अपघातास कारणीभूत ट्रक चालक आरोपी ताब्यात

Sat May 18 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत तरोडी पुलाचे वर आउटर रिंग रोडवर, ट्रक क. आर.जे ११ जि.बी ६३५४ चा चालक नामे मियाज मोहम्मद अनवर खान वय ४४ वर्ष रा. हसनपूर नोहू जि. नऊमेवत, हरीयाणा याने त्याचे ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे घटनास्थळी धोकादायकरित्या ऊभा केल्याने सलेंडर गाडी क्र. एम.एच ४० एल.व्ही ०९९० चा नालक नामे राकेश बंडू शेंडे वय २६ वर्ष रा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com