गुन्हेशाखा युनिट क्र. 5 पोलीसांची कामगिरी
नागपूर – दिनांक. 23.03.2023 रात्री चे सुमारास गुन्हेशाखा युनिट क्र. 5 चे अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेटोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून आरोपी झलेन्द्र किशनु लोधी वय 35 वर्ष, रा. डिप्टी सिग्नल झोपडपट्टी, राममंदीर जवळ, नागपूर यास मिनीमाता नगर, गल्ली न. 9, आदर्श किराणा जवळ, दुर्गाबाई बारले यांचे घरी पंचासह रेड कारवाई केली असता, आरोपी जवळ 1) एक देशी बनावटी गावठी कट्टा किं.अं.10,000/-रू 2) एकुण 7 जिवंत काडतुस प्रत्येकी कि.अं. 1000/-रू प्रमाणे असे एकुण 7000/-रू 3) एक रंसें चतपउम कंपनीचा जुना वापरता काळ्या रंगाचा कि-पॅड मोबाईल कि.अं. 500/-रू , असा एकुण 17,500/-रू असा मुद्देमाल मिळुन आला. यातील नमुद आरोपीताने मा. गृह विभाग महाराष्ट्र शासन त्यांचे अधिसुचनेचे व सह पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे मनाई आदेश कलम 37(1) मुपोकाचे उल्लंघन करून आपले ताब्यात विनापरवाना अवैध रित्या वरील नमुद वर्णनाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले. नमुद आरोपीताचे हे कृत्य गुन्हा कलम 3, 25 भा. ह. का. सह कलम 135 मु.पो.का. प्रमाणे होत असल्याने गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
सदर कामगिरी मुम्मका सुदर्शन , पोलीस उपायुक्त (डिटेक्षन) गुन्हे शाखा, मनोज सिडाम, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अति, कार्य यांचे मार्गदर्श नात पोलीस निरिक्षक किशोर पर्वते यांचे नेतृत्वात सपोनि रियाज मुलाणी, पोलीस अमलदार श्रीकांत साबळे, सुरज भारती, पंकज तांबडे, सुनिल वानखेडे, जितेन्द्र दुबे, पंकज लांडे, हिमांशु ठाकुर, प्रफुल्ल पारधी, गोपाल यादव, चालक विकास चंहादे यांनी केली.