नागपूर :- दिनांक ३०.०७.२०२३ चे ०४.२५ वा. चे सुमारास फिर्यादी हरमीत सिंग गुरविंदरसिंग जग्गी वय २८ वर्ष रा. ४९, बाबा बुध्दाजी नगर, टेकनाका, कामठी रोड, नागपूर हे त्यांचे कार ने पोलीस ठाणे अंबाझरी शंकर नगर चौक, एम.एस.ई.बी ऑफीसचे बाजुला पुन्नू ब्रेड ऑमलेटचे ठेल्यावर नाश्ता करण्याकरीता आले. फिर्यादी कारमधुन खाली उतरताच आरोपी १) आशुतोष प्रमोद अवस्थी वय ३५ वर्ष रा. प्लॉट नं. १०३. ताजी पॅलेस नंदनवन मेन रोड, जगनाडे चौक, नागपूर २) विक्की उर्फ गौरव हरीप्रसाद पांडे वय २८ वर्ष रा. प्लॉट न.५४ बापूजी नगर, गोधन रोड, मानकापूर व त्यांचे ईतर दोन साथीदार आरोपी यांनी फिर्यादी सोबत चार वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचे कारणावरून संगणमत करून फिर्यादीस अश्लिल शिवीगाळी केली. फिर्यादीस हातबुक्कीने मारहाण करून गडा दाबला व फिर्यादीस शस्त्राचा धाक दाखवून ५०,०००/- रु ची खंडणीची मागनी केली, खंडणी न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने घाबरून त्याचे जवळील २,०००/- रू काढुन आरोपींना दिले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे मपोउपनि कोकणी यांनी आरोपीविरुद्ध कलम ३८४, ३८६, २९४, ३२३, ५०६(३), ३४ भादंवि सहकलम ३/२५ भा.ह.कर अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क्र. १ व २ यांना अटक केली आहे. ईतर आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे..