नागपूर :- गुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभाग व युनिट क. ३ पोलीसांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांनी मिळालेले खात्रीशीर माहीती वरून सापळा रचुन वावा बुध्दाजीनगर, अपोलो मेडीकल स्टोर्सचे समोर, पाचपावली येथे एका संशयीत कारमधील ईसमास ताब्यात घेवुन त्याची व कारची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन एकुण २६ धारदार लोखंडी तलवारी किंमती ५२,०००/- रू. या शस्त्रसाठा मिळुन आल्याने जप्त केला. नमुद ईसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव रूपेश बिहारीराव आदीवासी, वय २० वर्ष, रा. वहा, हनुमान मंदीरजवळ, जि. गुल्हा, झारखंड असे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन शखसाठा व मारोती ईको कार असा एकुन १०,५२,०००/-रू चा मुद्देमालजप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरूध्द पोलीस ठाणे पाचपावली येथे कलम ४/२५, ७ भा.ह.का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीस पुढील कारवाईस्तव पाचपावली पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांचोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, संयुक्तीक रित्या पथकांनी केली.