नागपूर :- एम.आय.डी.सी. पोलीसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना खात्रीशीर माहीती मिळाली की, राजीवनगर, शांती निकेतन विद्यालयाचे समोरील एका नविन बांधकाम सुरू असलेल्या ईमारतीमध्ये ४ ते ५ ईसम शस्वासह आहेत. त्यावरून नमुद ठिकाणी पंचांसमक्ष रेड कारवाई केली असता, नमुद वर्णनाप्रमाणे नविन बांधकाम सुरू असलेल्या ईमारतीचे पहील्या माळ्यावरील एका खोलीत अंधारामध्ये काही ईसग दबा धरून बसलेले दिसुन आले. स्टाफचे मदतीने पाच ईसमांना ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता, त्यांनी त्याचे नाव १) मयुर संतोष पटले, वय १९ वर्षे, रा. निलडोह, एम.आय.डी.सी., नागपुर २) निखील उर्फ टिकली दयाल फुलकर, वय १९ वर्षे, रा. अमरनगर, एम.आय.डी.सी., नागपुर ३) सुरज लक्ष्मी यादव, वय २५ वर्षे, रा. राजीवनगर, एम आय डी सी., नागपुर ४) राजीव उर्फ टक्का मनोहर टेकाम, वय १९ वर्षे, रा. राजीवनगर, एम. आय.डी.सी., नागपुर असे सांगीतले. त्यांचा एक साथीदार ५) विधीसंघर्षग्रस्त बालक सुध्दा त्यांचेसोबत मिळुन आल्याने त्यास ताज्यात घेण्यात आले. आरोपींची अंगझडती घेतली असता, आरोपी क. १ चे ताब्यात एक लोखंडी धारदार तलवार किमती अंदाजे ४००/-रू. व एक मोबाईल तसेच, आरोपी क. २ चे ताब्यातुन एक लोखंडी टॉमी किंमती अंदाजे २००/-रू. व एक मोबाईल तसेच, आरोपी क. ०३ चे ताब्यातुन एक लोखंडी चाकु किंमती अंदाजे १००/-रु. व एक मोवाईल तसेच, आरोपी क. ४ चे ताब्यातुन एक लहान चाकु किंमती अंदाजे ५०/-रु. आणि विधीसंघर्ष बालकाचे पॅन्टचे खिशातुन एक पिवळ्या रंगाची नायलॉन दोरी अशा साहीत्यासह, संगणमत करून आपले ताब्यात प्राणघातक शस्त्र घेवुन कुठेतरी दरोडा टाकण्याचे तयारीत असताना समक्ष मिळुन आले. आरोपीजवळुन एकुण किंमती अंदाजे २०,७५०/-रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला.
आरोपीचा अभिलेख तपासला असता, आरोपी क. १ हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्यास मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क. ०१ यांचे आदेश क. पोतपआ/परि-१/ हद्दपार आदेश क. ०१/२४-१९८ दिनांक ११.०१. २०२४ अन्वये दोन वर्षाकरीता नागपुर शहर व जिल्हा नागपुर हद्दीतुन हद्दपार केले असल्याचे निष्पन्न झाले. तो कोणतीही कायदेशीर पुर्वपरवानगी न घेता, विनापरवानगी नागपुर शहरात येवुन त्याचे साथीदारांसह दरोडा टाकण्याचे तयारीनिशी मिळून आला.
आरोपीचे कृत्य हे कलम ३९९, ४०२ भा.दं.वि., सहकलम ४, २५ भा.ह.का., सहकलम १४२, १३५ म.पो. का. अन्वये होत असल्याने, फिर्यादी पोहवा. ओमप्रकाश खंडाते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एम. आय.डी. सी. येथे पोउपनि सुरेंद्र तिवारी यांनी गुन्हा दाखल करून आरोपी क. १ ते ४ यांना अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.