निवडणुकीच्या पूर्वदिनाला उमेदवार बंधूची अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघाती मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- कामठी तालुक्यात आज 5 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या ग्रा प सार्वत्रिक निवडणुकीतील नेरी ग्रा प चे प्रभाग क्र 1 चे उमेदवार योगेश झोड यांच्या निवडणूक मतदार संदर्भात मतदारांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त वेळेत आवंढी शिवारजवळील बी एन पाटील ढाब्याजवळून वाहन क्र एम एच 40 बी डी 9633 ने शेताकडे जात असताना मागेहून येत असलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली ज्यामुळे उमेदवार बंधू चा जागीच अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी 6 वाजे दरम्यान घडली असून मृतकाचे नाव पंकज भोजराज झोड वय 34 वर्षे रा नेरी तालुका कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले असून यासंदर्भात फिर्यादी उमेश मुरलीधर झोड वय 34 वर्ष रा नेरी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 304(ए),279 सहकलम 177,34 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आहे.

या मृत्यू प्रकरणात संशयाची सुई जात असून अपघाती घटना नसून घात झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मृतकाच्या पाठीमागे वडील,भाऊ पत्नी तसेच फक्त एक महिन्याची मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.पण हे अज्ञात आरोपी कोण?याचा शोध घेणे अतिशय गरजेचे आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील 10 ग्रा प निवडणुकीत 81 टक्के मतदान

Sun Nov 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आज 5 नोव्हेंबर ला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत संपन्न झालेल्या कामठी तालुक्यातील बाबूलखेडा, वारेगाव,कवठा, नेरी, उमरी,गारला,चकना,नान्हा मांगली,वरंभा, चिखली या 10 ग्रामपंचायतीच्या 10 सरपंच व 31 प्रभाग सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीएकूण झालेल्या मतदानाची टक्केवारी 81 टक्के झाल्याचे सांगण्यात आले असून उद्या 6 नोव्हेंबर ला कामठी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार नसून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com