आधार ऍट बर्थ… सोमेश परसराम मरसकोल्हे यांच्या नवजात बालकाला जन्मतः मिळाले आधार कार्ड

भंडारा : जन्मतः आधार कार्ड देण्याच्या उपक्रमात आज जिल्ह्यातील दुसरे आधार कार्ड देण्यात आले. जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे सोमेश परसराम मरसकोल्हे व  देवांगणा सोमेश मरसकोल्हे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या पहिल्या बालकाची जिल्ह्यातील पहिले आधार ऍट बर्थ नुसार जन्मतःच आधार मिळणारे दुसरे बालक म्हणून जिल्ह्यात नोंद झाली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकार यांनी आरोग्य केंद्रातच प्रसूती झाल्यानंतर नवजात बालकांना आधार कार्ड देण्याचा उपक्रमाविषयी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम राबविण्यासाठी नुकताच आढावा घेतला होता.           कोणत्याही योजनेचा लाभ घेतांना आधार कार्ड असणे गरजेचे असते. ते लक्षात घेता जिल्हाधिकारी महोदयांनी पदाची सूत्र घेताच आधार ऍट बर्थ या उपक्रमाविषयी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा व्यवस्थापक आयटी यांच्यासोबत सलग तीन बैठका घेऊन या उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले. त्यानुसारच आज सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये मरसकोल्हे दांपत्याच्या बालकाला जन्मतः आधार कार्ड देण्यात आले. जिल्ह्यातील या उपक्रमातील हे दुसरे आधार कार्ड असल्याने याची विशेष महत्त्व आहे. मात्र तरी देखील पालकांनी ग्रामीण तसे खाजगी रुग्णालयात रुग्णालयात जन्मताच आपल्या पाल्यांना आधार कार्ड मिळण्याची प्रक्रिया करून घेण्यासंबंधी देखील जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आवाहन केले आहे.

देवांगणा मरसकोल्हे यांची सिजरीयन शस्त्रक्रीया असून जन्मता बालकाचे वजन 2 किलोग्राम आहे. प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे त्या दाखल झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालय यांनी देवांगणा सोमेश मरसकोल्हे यांच्या नवजात बालकाच्या जन्माची ऑनलाईन नोंदणी करून पोस्ट ऑफिस भंडारा मार्फत आधार कार्ड जनरेट करण्यात आले. या आधारचा क्रमांक 2981/10354/00001/02/01/2023 आहे .या आधार कार्ड नोंदणी करिता जिल्हा शल्स चिकित्सक डॉ.डी.के.सोयाम, रेकॉर्ड किपर मनिषा जपसिंगपुरे, पोस्ट ऑफीसचे नितीन पाटील, सागर रोठोड, जिल्हा व्यवस्थापक जिल्हाधिकारी कार्यालय फारूक शेख, अमित नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पांचपावली पुलावर गड्डयाचे राज्य

Tue Jan 3 , 2023
नागपुर :- नागपुरला गड्ड्याचे शहर अशी ओळख मिळत आहे. पांचपावली पुलावर याचा प्रत्येय आपल्याला येतो. यावरून जाणारे प्रत्येक वाहन चालक घोड्यावर बसून जात असल्याचा अनुभव इथे करतात. या पुलावरील गड्डे काही प्रमाणात भरतात पण ते काही दिवसातच परत गड्ड्याच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं. असंच हा बोलके चित्र. यावरील वाहनचालकाशी बोललो असता त्यांनाही या पुलावरून मोदीच्या येण्याची वाट आहे. जेणेकरून या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com