संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कमसरी बाजार परिसरात सुरू असलेल्या महा मेट्रो रेल्वे स्टेशन बांधकामाच्या ठिकाणीच कन्हानकडे जाणाऱ्या प्लेजर मोपेड गाडीला मागच्या दिशेने कामठी कन्हानकडे जाणाऱ्या अनियंत्रित ट्रकने जबर धडक दिल्याने एक तरुण जागीच ठार झाल्याची घटना पाच वाजता सुमारास घडली असून मृतक तरुणाचे नाव विजय विश्वकर्मा वय/40 वर्ष रा कान्द्री कामठी असे आहे.
जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर कमसरी बाजार परिसरात महा मेट्रो रेल्वे स्टेशनचे बांधकाम सुरू असून कामठीवरून कन्हानकडे मोपेड प्लेजर गाडी क्रमांक एमएच 34 एएन 1771 ने जाणाऱ्या अनोळखी इसमास मागच्या दिशेने कामठीवरून कन्हानकडे जात असलेला अनियंत्रित ट्रक क्रमांक एमएच 40 एके 5120 मे जबर धडक दिल्याने प्लेजर मोपेडवरील 40 वर्षे वयातील तरुणाचा घटनास्थळीस मृत्यू झाला अपघात होताच ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला अपघात होताच राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प पडल्याने वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या घटनेची माहिती जुनी कामठी पोलीस स्टेशनला होताच सहाय्यक पोलीस उपआयुक्त विशाल क्षीरसागर ,जुनी कामठीचे ठाणेदार प्रशांत जुमडे ,वाहतूक पोलीस निरीक्षक नितीन पत्रांगे सहकार्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत केली अपघातातील दोन्ही वाहन जुनी कामठी पोलिसांनी जप्त केले असून जुने कामठी पोलीस स्टेशनला ट्रक चालका विरोधात कलम 281, 106 (बीएनएस) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक शेषकुमार पांडे ,अक्षय सावंत करीत आहेत ऑटोमोटीव्ह चौक नागपूर ते कन्हाननदी पर्यंत महा मेट्रो रेल्वेचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून आतापर्यंत दहा ते बारा नागरिकांना रोड अपघातात प्राण गमवावे लागले आहेत ज्या ज्या ठिकाणी महा मेट्रो रेल्वेचे काम चालू आहे त्या ठिकाणी महा मेट्रो रेल्वे प्रशासनाचे वतीने सुरक्षा गार्ड ठेवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.