संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
विदर्भ पंढरी मंदिरासमोरील घटना
कळमेश्वर –विदर्भाचे पंढरपूर म्हणून सर्व दूर परिचित असलेल्या विदर्भ पंढरी धापेवाड्या च्या चंद्रभागा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता घडली. अक्षय यशवंता चौधरी वय 23 वर्ष असे मृतक तरुणाचे नाव असून सावनेर तालुक्यातील वाकोडी गावामध्ये नात्यातील कुटुंबियाकडे मयत झाल्याने तो अंत्यविधी करिता गेला होता अंत्यविधी आटपऊन घरी गेला असता ऋषीपंचमीनिमित्त आंघोळीला आलेल्या काही महिलांचा स्वयंपाक त्याच्या घरासमोर सुरू असल्याचा दिसून आल्याने तो सरळ नदीकडे आंघोळी करिता गेला परंतु त्याचा पाय घसरल्याने चंद्रभागा नदीतील खोल पाण्यात तो बुडाला घटना घडल्यानंतर तब्बल दोन तास उशिरा त्याचा शोध घेण्यात आला मृतक अक्षय हा घरी एकुलता एक असून त्याचे वडिलांचा अगोदरच मृत्यू झाला आहे त्याचे मागे एक बहीण आणि म्हातारी आई असून मृतक अक्षय हाच एकता घरी कमवता होता मृतक अक्षयच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख ,कळमेश्वर पंचायत समितीचे सभापती श्रावण दादा भिंगारे, उपसभापती जयश्री वाळके ,धापेवाडा ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश डोंगरे यांनी घटनास्थळावर जाऊन मृतक अक्षय चा शोध घेतला सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने चंद्रभागा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे तेव्हा कोणीही चंद्रभागा नदीत मध्ये जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.