संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या छत्रपती नगर परिसर रहिवासी एका अविवाहित 22 वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान केली असून मृतक तरुणाचे नाव
गौरव रंदई वय 22 वर्षे रा छत्रपती नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता तर मृतकाच्या पाठीमागे असलेल्या बहिणीचे आधीच लग्न झाले होते.कुटुंबात आई वडीलासह वास्तव्य करीत असता वेल्डिंगचे कामे करीत होता.आज घरमंडळी कामावर गेल्याचे निमित्त साधून अज्ञात कारणावरून सदर तरुणाने आपल्या राहत्या घरातील पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या करीत जगाचा शेवटचा निरोप घेतला.दुपारी आई घरी जेवण करायला आले असता सदर आत्महत्येचे दृश्य बघून एकच हंबरडा फोडला लगेच शेजारील मंडळींनी मदतीची धाव घेतली मात्र तोवर मृत्यू झाला होता .सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नसले तरी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.