संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारत देशाला स्वातंत्र्य मिळो अथवा ना मिळो परकियाच्या दडपनापेंक्षा अन्तर्गत दडपशाही जातीयता,उचनिचता, भेदभाव विरोधाभास अज्ञान, अंधकार, चमत्कार, इतरांना हिन मानण्याची वृत्ती ,अन्याय, अत्याचार जोर जुलूम याने हताश झालेला, माणुस असुन सुद्धा पक्षुतुल्य अस्पृश्याच्या सर्वांगीण स्वातंत्र्याच्या लढ्यात मध्यप्रान्तातील नागपुर नगरीच्या शेजारी मिल्ट्री छावनी लगतच्या कामठी या छोटेखानी गावाचा ईतिहास अविस्मरणीय आहे या गावात विविध पंथाचे जातीचे लोक निवास करीत असतांना या गावात अस्पृश्य समाजातील काही लोक धनधान्याने परिपूर्ण होते. त्यात गोमा गणेश सावकार ज्यांचा सोण्याचादीचा व्यापार मध्यप्रान्तातील सर्व दुर पसरलेला होता त्याच्या कडे असंख्य लोक मदतीला होती. त्यानी समाज कार्यात सहभाग दिला. कामठी कन्ट्रोमेंट, रेल्वे, बिडी कारखानदारी व माटक्यावर विनकाम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात होती. आसपास च्या खेडेगावातुन व शेजारच्या जिल्ह्यातील लोक सुद्धा उदरनिर्वाहा साठी येऊ लागली राहू लागली होती. कामठी हे आता गाव राहीले नव्हते तर भरगंच्च शहर व्हायला लागले होते अशातच अन्याय अत्याचार व जातीयतेचे चटके वाढलेले होते. विध्यार्थी, तरूणाच्या मनात विद्रोही मानसीकता निर्माण व्हायला लागली होती.
यातच विद्रोहाचे पाणी पेटवणारा योध्दा आपल्यातिल समकालीन सहकार्याच्या सहाय्याने जातीयता धर्माधता बुवाबाजी चमत्कार देवादिकाची व सनातन्यांची फसवेगीरी अन्याय अत्याचार जोर जुलूम विविध क्षेत्रातील कामगारांचे शोषण या विरूद्ध बंड पूकारूण विषमतेचा नाईनाट करण्याकरीता आधुनिक राॅबिड हूड प्रमाणे पूढे सरसावला अस्पृश्यांची उन्नती हेच जिवन या ध्येयाने तरूण महार संघ ,महार समाज संघटन,स्वयसेवापथक, प्राणयज्ञ दल, अखाडे व्यायामशाळा, अनाथ निराश्रीत रंजल्या गांजल्या दिन दुबळ्या करीता निशुल्क शिकवणी ,सहकारी तत्वावर वाचनालय, शाळा ,मजुरांकरीता रात्र शाळा,कापड किराना धान्य दूकाने,शोषण मुक्त समाज निर्माण करण्या करीता शेतकरी शेतमजुर, बिडी कामगार, गिरणी कामगार, माईंस कामगार, याच्या मध्ये संघटीत होऊन न्याय हक्कासाठी लढण्यास प्रवृत्त करण्यासाठी वर्तमान पत्र, पथनाट्य, नुक्कड सभा ,कविता, पोवाडे,विविध प्रकार चे आंदोलन उभे करून आपल्यातिल सुक्त गुणाने जनजागृती करण्या चा प्रयत्नशील असनारा आशेचा किरण जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन होय. आपल्यातिल कौसल्याच्या बळावर व सहाकार्यांच्या मदतीवर विषमतावाद्यावर भीती निर्माण करू लागले. कामठी शहर हे विद्रोही योद्धे निर्माण करण्याचे केंद्र बनु लागले. कालांतराने या विद्रोही योद्ध्याचे कार्यक्षेत्र वाढत गेले, देशात असलेला अंधकार चमत्कार गुलामी असमानता या विरूद्ध लढण्यास सुर्यप्रकाश रूपी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वावर विस्वास ठेऊन नव्या ऊजेडाची अपेक्षा बाळगुन आपल्या घरावर व व्यक्तीगत प्राकृर्तीक अपेक्षावर नागर फिरवून समाज उन्नती साठी श्रम केले डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाकेला ओ देवून प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करू लागले. आपल्या तील संघटन शक्तीच्या बळावळ मौक्याच्या जागा बळकावु लागले या मध्ये अनेक ज्ञातअज्ञात अनगिनत सहकार्याचे सहकार्य लाभले, ज्यात प्रामुख्याने गौरीशंकर गजबे, सिताराम हाडके अॅड हरिदास आवळे,आर आर पाटील विक्रम सनकाडे, सदाशिव मानवटकर, विश्राम सवाईतूल,जगन्नाथ अंधारे हरिप्रसाद शिवप्रसाद, सचिदानंद मानकेबंधू,हरदास चांदोरकर धोंडबा मेंढे आकांत माटे मुरारी मेश्राम हैबतीनंद बिहाडे, हरी कुंभारे बाजीराव सुखदेवे, एल डी नितनवरे शंकर बेले मांगोजी रंगारी या सारख्या असख्य लोकांनी स्थानीय आणी मध्यप्रान्ता सह राष्ट्रीय स्तरावर कार्य केले. अस्पृश्यता निवारण करण्यास डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र आदोलनाला सुगीचे दिवस आले होते. यातच मध्यप्रान्तातील सेनानायक जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन यांचं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी निधन झाल, हे चळवळीच्या योद्ध्याच्या जिव्हारी लागले यातच हरीजी कुंभारे यांचा मुलगा नारायण विध्यार्थी अवस्तेत असतांना एल डी नितनवरे यांच्या मोठ्या मूलाच्या जन्मदिन निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आपल्यातिल सामाजिक जानिवाना उपस्थिता समक्ष माडत असतांना एक बानेदार योद्ध्याप्रमाणे मार्गदर्शन केले. उपरोक्त कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या वक्तव्याचा गौरव केला उत्कृष्ट वक्तव्य म्हणून प्रसंशा केली मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे गौरोदगार काढले.
हरिजी कुंभारे याची आर्थीक परिस्थीती कमकुवत होती छोटेखानी चहा च्या व्यवसायावर चार मुली दोन मुलांचे संगोपन करीत होते. पत्नीचे आधिच निधन झाले होते अशातच मुलांच शिक्षण ,नारायण यांना समता सैनिक दल व अखाड्याचा छंद वसाहतीतील समवयीन तरूणांसोबत सामाजिक जाणीवा समोर थेवून ते बेचैन असायचे त्याची शिक्षणाची आवड लंक्षात घेता. बिडी कामगार महीला त्यांच्या कडून छोटेमोठे काम करवून घ्यायच्या त्या बदल्यात आना दोनआना द्यायच्या त्यातच ते आपला खर्च भागवायचे थोरा मोठ्यांच्या सहवासात सार्वजनिक जिवनात आपल्यातिल समकालीन मित्रासोबत सहभागी व्हायचे बिडी कामगाराच्या व्यथावेदना जवळून बघताना त्याबद्दल त्यांना चिढ यायची त्याकरीता मजूराच्या शोषण विरूद्ध लढण्यास प्रवृत्त होत गेले मध्यप्रान्त बिडी कामगार संघ, विध्यार्थी फेडरेशन शेड्यूल कास्ट फेडरेशन आदी च्या आदोलनात हिरीरीने भाग घेऊन अन्याय अत्याचार विरोधात जनसामान्य लोकांच्या हितार्थ विविध उपक्रमात सामील होऊ लागले. वेदनाचे चटके सोसून विद्रोही कविताची मांडणी करणारा वतृत्व शैलीमध्ये वरचढ असनारा मिलनसार मनमीळावू वृत्ताचा हा दूसर्या फळीतील यूवा योद्धा वकिली पास करून लेबर कमिश्नर शासन प्रशासना समोर न्यायाची दाद मागू लागले. यातूनच लहानामोठ्यांचा प्रेमाने दादा म्हणुन परिचीत अॅड दादासाहेब कूंभारे या नावाने चिरपरिचीत झाले बिडी कारखानदारी असलेल्या कामठी, नागपुर भंडारा,तूमसर तिरोडा गोंदिया बालाघाट राजनांदगांव रायपुर जबलपुर आदी कचेरीच्या ठीकानी विविध प्रकार चे आंदोलन करून कारखानदारा कडून मजूरांना न्याय मिळवुन देण्याच्या संघर्ष करीत असता ईतर क्षेत्रातील कामगार विषयक धोरणाना लागू करण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले 1956च्या धंम्म क्रान्तीच्या आयोजन करण्यात अतिशय उत्कृष्ट जबाबदारी सांभाळत रिपब्लिकन पंक्षाच्या उभारण्यात सूद्धा त्याचा मोठा वाटा राहीला त्या काळातील रिपब्लिकन पंक्षाचे आदोलन मोर्चे धरना-प्रदर्शन यांच्या यशस्वीते करीता कामगार चळवळीचा अभीन्न अंग म्हणून आधारस्थभ म्हणुन कामगाराच्या हृदयाचा प्रेरक मार्गदर्शक म्हणुन दादासाहेबा कडे बघीतले जायचे, दादासाहेब सूद्धा बौध्दाच्या समस्या असो कि एस सी, एस टी, भूमीहिनाच्या समस्या असो की कामगार विषयक आदोलन असो रास्तारोको रेलरोको जेलभरो आदोलन असो प्रत्येक आदोलनात हिरीरीने सहभाग देण्यात अग्रेसर राहत होते. राज्यसभेवर खासदार असताना विविध विषयसमीतीवर असतांना आपल्या समस्याची सोडवणूक करण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत असत अभ्यासपूर्ण मांडनी करीत असत. परमपुज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती दींक्षाभूमीचे कार्याध्यक्ष म्हणुन तन मन धन देऊन विकासकार्यात मदत करीत होते. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक उद्दीष्ट पुर्ती साठी व सर्वसाधारण विध्यार्था सुलभ शिक्षण घेता यावे. या करिता आपल्या परिचयाचा लाभ घेत डाॅ बाबासाहब आंबेडकर महाविध्यालय विविध फॅकल्टी सह सुरू करण्यात दादासाहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. दींक्षाभूमीवर धम्म प्रचार-प्रसार कार्य व्हावे या करीता भीक्खु निवास चद्रमनीकुटी उभारण्या सोबत बोधिवृक्ष लावण्या पर्यत दीक्षाभूमी येथे पाली चे शिक्षण देता यावे या साठी स्मारक समीतीच्या अन्य पदाधिकार्यासोबत प्रयत्नशील राहीले. भीक्खुसंघास सतत विकास कार्यात आदराने सहयोग प्रदान करतांना डाॅ भदंत आनंद कौसल्यायन जी असो की कोणीही भीक्खु धार्मिक क्षेत्रातील काम किवा अडचनी असतील ते कार्य पूर्णत्वास नेण्या करीता दादासाहेब केव्हाही तत्पर असायचे कामठी येथील हरदास विद्यालय भवन येथे 1975/77लाभदंत धर्मकिर्ती याचे अभिधंम्म विषयक व समथसमाधी विपंसना ज्ञान शिबिर आयोजित करण्यात व त्याला यशस्वी करण्यात व हरदास स्मृती स्मारक स्मृतीभूमी हरदास घाट कन्हान येथे श्रामनेराची उपसंपदा घडवून आनण्यात दादासाहेबांनी आणि त्याचे सहकारी कार्यकर्त्यानी खूप मेहनत घेतली.
दादासाहेब यांचा जन्म वारीसपूरा नयागोदाम आताचे प्रबुद्ध नगर येथे झाला. पहिल्यादा वर्षावासनिमीत्त भदंत सदानंद जी होते. वसाहतीतील अनेक तरूण श्रामनेर झाले. त्याच कालावधित दीक्षाभूमी येथे राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते उच्च शिक्षित विध्यार्थी श्रामनेर झाले. त्यात रा. सु. गवई सूध्दा होते. गौतम नगर कामठी येथे रेल्वे लाईन जवळ बुद्ध मुर्ती स्थापीत करण्यात आली होती तेव्हा बौद्ध उपासीका संघ स्थापित करण्यात दादासाहेब यांचे फारच मोठे योगदान राहीले ,1982ला भदंत धर्मकिर्ती महास्थविर यांचे पिवळीनदी काठावर चेतना वुड इंडस्ट्रीज येथे दहा दिवसीय बुद्ध धंम्म प्रशिक्षण शिबिरात दादासाहेब व नलिनी ताई यानी कामठीतील लोका कडून दान मिळवुन दिले होते. एक दिवस शिबिरात फळदान केले होते ,
कामठीतील खाजगी शाळाचे क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत तेव्हा दादासाहेब समारोपीय कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहुन सहकार्य प्रदान करीत असत
जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास एल एन यांच्या स्मृती निमित्त कन्हान नदी काठावर हरदास घाट येथे हरदास मेळावा श्रीमत बाबू गौरीशंकर गजबे आयोजित करायचे त्यानंतर हरदास शैक्षणिक सांस्कृतिक संस्था मार्फत दादासाहेबाच्या मार्गदर्शनात होत होते
कामठी येथून पालखी निघायची डाॅ बाबासाहब आंबेडकर चौक शुक्रवार बाजार येथे सर्व ऐकत्रीत यायचे डाॅ बाबासाहब आंबेडकर मार्ग आवळे चौक हरदास नगर नागपुर येथून हात ठेल्यावर बाबू हरदास एल एन यांचा फोटो व पुष्पचक्र असायचा पायीपायी कामठीला आंबेडकर चौक येथे जायचे तिथे पदयात्री चे दादासाहेब स्वागत करीत असत तिथून हरदास घाट कन्हान हरदास स्मृती स्मारक येथे अभिवादन केले जायचे दादासाहेब तीथे अभिवादन करताना नेहमी म्हणायचे शहिदोकी चिताओ पर लगेगे हर बरस मेले समाज उन्नती के लिए मरने वालो का बाकी यही निशा होंगा,
कर्मवीर अॅड दादासाहेब ना ह कुंभारे यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र आदोलनात प्रथम फळीतील जेष्ठांनी आरंभ केलेल्या उपक्रमाना ध्येय धोरणाना प्रामाणिक पणे पूढे नेण्याचे च नव्हे तर त्यांना विविधागी मार्गाने न्याय मिळवुन देण्यात अग्रेसर राहिले, समता सैनिक दल च्या अनुशासन बंद्ध तालीमीत चळवळीचे धडे अंगिकारूण,शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्यप्रान्त बिडी मजदूर संघ,दि बुद्धिष्ट सोसाइटी.ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया परमपुज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती,हरदास शैक्षणिक सांस्कृतिक संस्था, कामठी बिडी उत्पादक मजदूर सहकारी संस्था महाराष्ट राज्य बिडी मजदूर संघ, कामठी बिडी कामगार सहकारी पत संस्था जयभारत सोसायटी आणी ईतर क्षेत्रातील कामगार हिता साठी त्यांच्या न्याय हक्का साठी पायाला भिंगरी बांधल्या समान जिवाची पायपिट करून मिळेल त्या साधनाने संघर्ष करीत असत राज्य सभा खासदार म्हणुन व शासकीय समीत्यांचा पदाधिकारी म्हणुन लोकोपयोगी जिवनावश्यक समस्या ना वाचा फोडण्या साठी हजारो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करून जनसामान्य जनतेच्या व्यथा वेदना सोडविण्याकरीता कष्ट उपसले बौद्धांचे प्रतिनीधी म्हणून जागतीक अनेक देशात भ्रमन केले
रेल्वे मध्ये एस सी, एस टी असोसिएशन ला मान्यता मिळवुन देण्यात दादासाहेबांचे योगदान नाकारता येत नाही आयूष्याच्या शेवटच्या स्वासा प्रयत्न सक्रिय असनारे दादासाहेब, मनमिळावु, मृदभाषी, शांत संयमी, विरोधकांच्या विरोधाला विरोध करीत राहण्यापेंक्षा आपल्या जबाबदार्या प्रती एक बानेदार पने कार्यरत सेनानी ज्यांनी चळवळीतील मार्गदर्शक तत्वाच्या मार्गदर्शनात्मक ऋणानूबंधा चा वसा उत्तरदायित्व म्हणुन स्विकारला,
अशा या उत्तुंग शिखराचे धनी,कामगार चळवळीतील आधारवड,संद्धमाच्या वाटचालीतील एक सौजन्य शील धम्मसेवक, रिपब्लिकन चळवळीतील चानाक्क्ष योद्धा, जनसामान्याच्या वेदनांचा हूंकार असलेल्या अजातशत्रू व्यक्तीमत्व बौद्ध प्रिय, कर्मवीर अॅड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त त्यांच्या साडेचार दशकातील अष्टपैलू कलागूणाना व कार्य कर्तुत्वास शतशः अभिवादनिय स्मरण करून आदरांजली अर्पीत करताना त्याच्या कार्याचा वसा चिरंतन आंबेडकर चळवळीतील ईतिहासाची साक्ष देत राहील.