संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 13 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कामठी -रणाळा मार्गावर असलेल्या सिटी हॉस्पिटलवर करण्यात आलेली रोषणाई संपूर्ण कामठी शहरवासी, रणाळा, येरखेडा वासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.सिटी हॉस्पिटलच्या इमारतीवर साकारण्यात आलेल्या स्पॉट लाईट च्या प्रतिकृतींतुन सिटी हॉस्पिटल ने राष्ट्रभक्तीचे अनोखे दर्शन घडविले आहे.या राष्ट्रभक्तीचे अनोखे दर्शन घडविण्यासाठी सिटी हॉस्पिटल चे डॉ तंजीम आजमी,डॉ उमेझा आजमी,डॉ रेहान आजमी यांनी मोलाची भूमिका साकारली आहे.
रात्रीला सिटी हॉस्पिटलच्या इमारतीवर तिरंग्याची रंगरंगोटी केलेल्या दृश्य दिसत असून सिटी हॉस्पिटल च्या इमार्तिवरील ही रंगरंगोटी व रोषणाई पाहण्यासाठी रात्रीला नागरिकांची एकच गर्दी होत आहे.कामठी कळमना मार्गावरून ये जा करणारे वाहतूकदार रणाळा मार्गावर असलेल्या सिटी हॉस्पिटलचे हे रोषणाई दृश्य पाहण्यासाठी थांबून पाहण्याचा मोह आवरता येत नाही.राष्ट्रभक्ती जागृत करणारी ही रोषणाई स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सिटी हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आली आहे.स्पॉट लाईटच्य मदतीने इमारतीवर रोषणाई च्या माध्यमातुन साकारण्यात आलेली ही रोषणाई राष्ट्रभक्ती जागृत करणारी ठरत आहे.