अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध गुन्हा नोंद वाहनासह एकूण ४०,५०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त

मौदा :- दिनांक १७/०६/२०२४ रोजी सकाळी ११/५० वा. दरम्यान पोस्टे मौदा येथील स्टाफ पो. स्टे. हद्दीत स्टाफसह बकरी ईद सणा निमित्त बंदोबस्त दरम्यान पो. स्टे. परिसरात पेट्रोलिंग करीत असताना भंडारा ते नागपूर NH-53 रोडवर टिप्पर क्र. MH-40/CM-9910 हा येताना दिसल्याने बोरगाव शिवारातील सांड नदीवरील बोरगाव पुलावर रेती वाहतुकीच्या टिप्परला थांबवून पाहणी केली असता १२ चाकी टिप्पर क्र. MH-40/CT-9910 मध्ये अंदाजे ८ ब्रास रेती मिळून आल्याने सदर ट्रक बालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बावत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगून ट्रक मालकाचे सांगण्यावरून भंडारा येथील रेती घाटातून आणल्याचे सांगितले. सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने टिप्पर क्र. MH-40/CT-9910 किं. रु. ४०,००,०००/- व त्यामधील ८ ब्रास रेती किं. रु. ४०,०००/- तसेच आरोपीचा मोबाईल फोन की १०,०००/- असा एकूण रु. ४०,५०,०००/- चा मुद्देमाल जप्त करून टिप्पर चालक नामे आकाश जयसिंग मडावी वय २७ वर्ष रा. दिघोरी ता. जि. भंडारा तसेच ट्रक मालक अमित नन्हेलाल यादव रा. मौदा यांचे विरुद्ध पोस्टे मौदा येथे कलम ३७९, १०९ भा. द. वी. सहकलम ४८ (७),४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे अधी. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. मौदा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर कार्यवाही पोलीस हर्ष पोद्दार सा., अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पो. अधिकारी कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, स.फौ. भास्कर मेटकर, पो. हवा. सतीश नागपुरे, बासफौ कोठे यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा, गणेश मुदमाळी हे करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खापरखेडा पोलीसांनी माउझर ठेवणा-या आरोपीस केले अटक

Tue Jun 18 , 2024
खापरखेडा :- मागील काही दिवसापासुन खापरखेडा पोलीसांनी सतर्कतेमुळे पो.स्टे. खापरखेडा परिसरातुन ८ माउद्वार जप्त करण्यात आलेले आहे. काही दिवसाअगोदर खापरखेडा वार्ड क. ०१ चिचोली खापरखेडा येथे राहणारा अभिषेक अंहिसक पाटील याने किरकोळ भांडणात लोकांना भिती दाखविण्याचे उददेशाने एक देशी माउझर काढुन हवेत लहरविली होती. पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी बी पथकाला यांची चाहुल लागताच ठाणेदार धनाजी जळक यांनी सदरची माहीती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com