नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत पोळा व भारत सना निमल ड्राय डे असल्याने अवैध दारू विक्री करणारे आरोपांविरुध्द कारवाई करीता यशोधरानगर पोलीसांनी वेगवेगळे पथक तयार करून त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून हद्दीमध्ये आरोपी १) सरोज आनंद बोरकर वय ५२ वर्ष २) राहुल मधुकर साखरे वय ३८ वर्ष दोन्ही रा. बहुजन हितकारणी बौध्द विहारा जवळ यशोधरानगर ३) गोविंदा रघुनाथ निखारे वय ४० वर्ष रा. बिनाकी मंगळवारी तलाव जवळ ४) ममता किशोर बघेले वय ५३ वर्ष रा धम्मानंद नगर ५) भागवत रामा राउत वय ५८ वर्ष रा. भिमवाडी पिवळी नदी ६) नितेश सुभाष झाडे वय २७ वर्ष रा. प्रवेश नगर यशोधरानगर यांचे ठिकाणी रेड कारवाई करून त्यांचे जवळुन देशी-विदेशी व मोहा फुलाची गावठी दारू असा एकूण १,४२,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध वेगवेगळे सहा दारू बंदी कायदानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त परि क ५. सपोआ जरीपटका विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि ज्ञानेश्वर भेदोडकर, सपोनि विलास मोटे, योगेश महाजन, पोउपनि सचिन भालेराव, वाकडे, पोहवा श्याम कडु, नापोअ अमोल आप्तुरकर, पौअ, रोहित रामटेके, नारायण कोहचाडे, अमीत ठाकुर, रोशन जयस्वाल, मयूर गवई, सागर जयस्वाल यांनी केली.