आर्थिक व्यवहाच्या वादातुन एकाएक गोळीबार 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– भाडंण सोडविताना आईला मुलाच्या हातुन बंदुकीची गोळी लागुन आई जख्मी

– मुलगा सुनिल तिवारी अटक, दोन बंदुक, एक चाकु जप्त.  

कन्हान :- कांद्री येथील वार्ड क्र.४ येथील सुनिल तिवारी यांचे घरी नितीन केशरवानी हा सोबत दोघाना घेऊन पैसे मागण्यास गेेले असता आर्थिक व्यवहारा तुन वाद विकोपाला गेल्याने सुनिल ची आई शोभा तिवारी या भाडंण सोडविण्यास गेली असता सुनिल च्या हातातील बंदुकीची गोळी चालुन मधे आलेल्या आई शोभाच्या हाताला लागुन गंभीर जख्मी झाल्याने पोलीसानी जख्मी शोभा तिवारी ला उपचाराथ दाखल करून मुलगा सुनिल तिवारी यास अटक करून दोन बंदुक, एक चाकु जप्त करित पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

गुरूवार (दि.२८) मार्च २०२४ ला सकाळी ९.३० वाजता दरम्यान जे एन दवाखाना कांद्री जय दुर्गा मंगल कार्यालयाच्या जवळपास वार्ड क्र.४ येथे सुनिल तिवारी घरी असताना नितीन केशरवानी हा सोबत दोघाना घेऊन पैसे मागण्यास गेेले असता सुनिल च्या घरासामोर रस्त्यावर आर्थिक व्यवहारातुन भांडण होऊन वाद विकोपाला गेल्याने सुनिल ची आई शोभा तिवारी ही भाडंण सोडविण्यास गेली असता सुनिलच्या हातातील बंदुकीची गोळी चालुन मधे आले ल्या आई शोभाच्या हाताला लागुन गंभीर जख्मी झाल्याची माहिती कन्हान पोलीसानी मिळताच कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार उमेश पाटील, एपीआय प्रराग फुलझेले पोलीस कर्मचा-यासह घटनास्थळी पोहचुन जख्मी शोभा तिवारीला कामठी येथील खाजगी रूग्णालयात उपचाराथ दाखल करण्यात आले असुन पसार झालेल्या मुलगा सुनिल तिवारी यास क पोलीसानी अटक करून दोन बंदुक, एक चाकु जप्त करून कन्हान पोलीस कार्यवाई करित असताना हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, उपिभागिय अधिकारी संतोष गायकवाड, ओमप्रकाश कोकाटे पोनि स्थागुअ शाखा नागपुर हयानी तपास यंत्राने सह घटनास्थळाला भेट देऊन योग कारवाई चे निर्देश देण्यात आले आहे. बातमी लिहे पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन ला सदर गुन्हा दाखल होत होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वस्तुस्थिती लक्षात न घेता, लोकांना धडे देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रत्युत्तर द्यायला हवे - सीएए बद्दल उपराष्ट्रपतींचे उद्गार

Fri Mar 29 , 2024
नवी दिल्ली :- सीएए कायद्याबद्दल, अज्ञानमूळक मते व्यक्त करण्यासाठी सार्वभौम व्यासपीठांचा वापर करणाऱ्या प्रवृत्तींविषयी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा हा आपल्या शेजारच्या धार्मिक आधारावर छळल्या जाणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठीच लागू करण्यात आला आहे. असे सांगत, ह्या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही, अशी वस्तुस्थिती असतांनाही, त्याबद्दल दिशाभूल करणारी वक्तव्ये केली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights