नागपूर :- नागपुर शहरात महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ तर्फे या शहरातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसढ़, महाराष्ट्र तसेच झारखंड अस्या विविध राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, कुटुंब नियोजन ऐसे इतर मानवीय जीवन घडविनारे उपक्रम करुन ” परमात्मा एक “मार्ग स्थापन केला व त्यामाध्यमातून अनेक दुखी परिवार या मार्गासोबत लाखोंच्या संख्येत जुळल्या गेले. पण गेल्या 29/03/2024 या तरखेला ता. मोहाडी भंडारा येथे बागेश्वर धामचे धीरेन्द्र शास्त्री महाराज यांनी स्वताच्या प्रसिद्धीसाठी या मार्गावर व संस्थापक बाबा जुमदेवजी वर टिका करुन चेस्टा करण्यात आली त्यामुळे लाखों सेवकांची भावना दुखवाली त्यामुळे सम्पूर्ण विदर्भात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते व त्यांच्यावर विविधठिकाणी गुन्हे दखल करण्यात आलेत. यापूर्वीही धीरेन्द्र शास्त्री यांनी महाराष्ट्रात येऊन अनेक संतावर टिका टिपण्णी करुन येथील जनतेच्या भावना दुखावण्याचे काम केलेत म्हणून आपण आपल्या माध्यमातून गृहमंत्री व पोलिस महासंचालका सोबत चर्चा करुन धीरेन्द्र शास्त्री यांना महाराष्ट्रात कार्यक्रम करण्यास बंदी घालावी अशी मागणी निवेदनात राकपा चे ओबीसी सेल अध्यक्ष रुपेश बांगडे यांनी शरदचंद्र पवार खासदार व रा.कॉ.पा पक्षाध्यक्ष यांना केली आहे