मौदा :- अंतर्गत १० किमी अंतरावरील वडोदा शेत शिवार येथे दिनांक १९/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन मौदा चे पथकांस एका आंब्याच्या बगीच्यामध्ये एकुण २५ गोवंश जातीचे जनावरे त्यापैकी १४ मोठे बैल, ०६ गाई व पाच लहान गोरे ०५ सदर जनावरांना कोणत्याही चारापाण्याची व्यवस्था न करता अत्यंत क्रूरतेने त्यांचे पाय बांधुन ठेवण्यात आलेले दिसुन आले, सदर जनावराची वैद्यकीय तपासणी करुन जनावरांना पालन पोषण करीता मातोश्री गौशाला रंगीपार पोहळी जि. भंडारा याना पत्र देवुन सदर २५ जनावरे त्यांच्या ताब्यात देण्यात आले. सदर प्रकरणी फिर्यादी पोहवा चांदेवार पो.स्टे. मौदा यांचे लेखी रिपोर्ट वरून आरोपी शबाब अहमद वल्द मुश्ताक रा. वारीसपुरा सार हॉटेल जवळ मरकस मस्जीद कामठी जि नागपुर व शंकर दरोडे रा वडोदा ता कामठी जि. नागपुर यांचे विरुद्ध पो.स्टे, मौदा येथे अप क्रमांक ३६९ / २३ कलम ३४ भादवि सहकलम ११ (१) (डी), ५ अ, ५ व ९ प्राणि संरक्षण अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि प्रमोद चौधरी पो.स्टे. हे करित आहे..