नागपूर :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या 4 ऑगस्ट 2023 रोजीच्या नागपूर दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. संबंधीत यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
उपराष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी तसेच राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी आणि इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव व राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय महसूल सेवा विभागाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या ‘प्रणिती’ या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.