डिवाईन रेस्टॉरंट ॲन्ड लाॅजिंग येथे सुरु असलेल्या देह व्यापार अड्यावर धाड, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक नागपुर ग्रामीण पथकाची कारवाई , तीन आरोपी अटक

कारवाई दरम्यान ३५,२०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त , कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल 

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन किमी अंतरावर असलेल्या डिवाईन रेस्टाॅरेंट अँड लाॅजिंग येथे सुरु असलेल्या देह व्यापार अड्यावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक नागपुर ग्रामीण पथकाने धाड मारुण चार ते पाच मुलींची सुटका करुन दोन आरोपी सह एका पिडित महिलेला ताब्यात घेऊन त्याचा जवळुन एकुण ३५,२०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दि. १७ जानेवारीला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक नागपुर ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी वय ४२ वर्ष हे कार्यालयात हजर असतांना अ.मा.वा.प्र. कक्ष नागपुर ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक मिरा मटाले यांनी ४.१५ वाजताच्या दरम्यान पंच नामे १)शितल अमित पाटील , वय 44 वर्ष, २) वर्षा रामदास पाटील, वय 40 वर्ष यांना कार्यालयात बोलावून कळविले की, माणिक शामराव भोवते, वय 52 वर्ष रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ वार्ड नं. 4, टेकाडी ता. पारशिवनी, गोंडेगाव नागपूर, नावाचे ईसम हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता मुलींना पैशाचे आमिष देवून देहव्यापारास प्रवृत्त करुन त्यांच्याकडुन जबलपुर हैद्राबाद बायपास रोडवर केकेबीपी टोल प्लाजा जवळ असलेल्या डिवाईन रेस्टोरेंट ॲन्ड लॉजींग या ठिकाणी देहव्यापार करवून घेतो . अशी खात्रीशिर माहिती फ्रिडम फर्म या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन मिळाल्याने पोलीसांनी सदरची माहिती प्रभारी पोलीस उप-अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष नागपूर ग्रामिण यांना देवून त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्याची लेखी परवानगी दिल्याने सदर ठिकाणी बातमीची शहानिशा करून कारवाई करावयाची असल्याचे कळविले. त्यावरून पोलीसांनी रेडची तयारी करून पोलीस उपनिरीक्षक मिरा मटाले यांनी रेड करीता बोगस ग्राहक यांना कार्यालयात बोलावुन कारवाई बाबत पंचासमक्ष बोगस ग्राहक पंचनामा कारवाई करून पोलीस स्वतः सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी , पोलीस उपनिरीक्षक मिरा मटाले , पोलीस हवालदार ज्योती वानखेडे , नापोशि अर्चना कांबळे , अ.मा.वा.प्र. कक्ष नाग्रा, पोलीस उपनिरीक्षक कुमुदिनी पाथोडे , भरवसा सेल नाग्रा., पोलीस हवालदार स्वाती लोखंडे , नापोशि गजेन्द्र निबेकर , पोशी प्रफुल भातुलकर , पोहवा आसिफ सैय्यद सह आदि पोलीस कर्मचारी आणि दोन पंच नामे १) शितल अमित पाटील, वय ४४ वर्ष, २) वर्षा रामदास पाटील, वय वर्ष व बोगस ग्राहक असे खाजगी व सरकारी वाहन क्र. एम एच ३१ डी. झेड. ०१३४ ने तपासकिट सह रवाना होवून जबलपुर हैद्राबाद बायपास रोडवर केकेबीपी टोल प्लाजा जवळ असलेल्या डिवाईन रेस्टोरेंट ॲन्ड लॉजींग चे जवळ पोहचले. पोलीसांनी बोगस ग्राहकाला ५०० रू ची ०१ नोट,२०० ची ०१ नोट व १०० ची ५ नोटा असे एकूण १२००/- रू कार्यालयातच देण्यात आले होते व त्यांना परत सुचना देवुन गाडीतून उतरवून पुर्वी दिलेल्या सुचनांचे पालन करण्यास सांगून परीस्थितीनुसार इशारा करण्याकरीता मोबाईलवरून कॉल अथवा मसेज द्यावा असे समजावून सांगुन बोगस ग्राहकास पाठविले.

बोगस ग्राहकाचा वेळ अंदाजे सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्याचेकडील मोबाइल फोनवरून मिस कॉल चा इशारा आल्याने प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे जबलपुर हैद्राबाद बायपास रोडवर केकेबीपी टोल प्लाजा जवळ असलेल्या डिवाईन रेस्टोरेंट ॲन्ड लॉजींग येथे पोलीस पोहोचली आणि डिवाईन रेस्टोरेट अॅन्ड लॉजिंगच्या मुख्य ईमारतीच्या तळमजल्या (ग्राऊड फलोर) च्या उजव्या बाजुला असलेल्या पायरीने खाली उतरून तळघराला (बेसमेंट) लागलेल्या पिवळसर रंगाच्या शटर मधुन आत गेले असता समोर उजव्या बाजुला असलेल्या लाकडी काऊंटर च्या समोर एक पुरुष दिसला त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव माणिक शामराव भोवते, वय ५२ वर्ष रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ वार्ड नं. ४. टेकाडी ता. पारशिवनी, गोंडेगाव नागपूर असे सांगीतले, त्यांना बोगस ग्राहक व पीडीत बाबत विचारपुस केली असता आत काऊंटरच्या उजव्या बाजुला असलेल्या ५ रूम पैकी, रूम क्र.४ मध्ये आहे असे सांगितले सदर पुरुषांस पोशि/प्रफुल्ल भातुलकर यांच्या ताब्यात दिले . तसेच रुम क्रं.४ चा दरवाजा ठोठावला असता बोगस ग्राहकाने दरवाजा उघडला व पोलीस उपनिरीक्षक मिरा मटाले , पोलीस उपनिरीक्षक कुमुदिनी पाथोडे व पंचा सह रुमचे आत प्रवेश केले असता एक पिडीत मुलगी अर्धनग्न अवस्थेत मिळुन आली तिला कपडे घालण्याची समज दिली बोगस ग्राहका सोबत असलेल्या पिडीत मुलीस विश्वासात घेवून विचारपूस केली . तसेच काऊंटर च्या मागच्या बाजुला असलेल्या रुम न.१ मध्ये दोन पिडीत मुली मिळुन आल्या .रुम नं. ५ मध्ये दोन पिडीत मुली मिळुन आल्या

 

पोलीसांनी पिडीत मुलींना अधिक विचारपुस केली त्यांचेपैकी एका मुलीने सांगितले “कि अंदाजे एका महिण्यापुर्वी मी व माझी बहिण सोबत कमाल चैक नागपुर येथे कपडयाच्या दुकानात काम शोधायला गेलो असता काम मिळाले नाही”. “तेव्हा माझी बहिण अली हिची मैत्रिणीला मदतीसाठी भेटायला बोलवले होते .बहिणिच्या मैत्री ने काम आहे, असे सांगितले आणि देह व्यापाराचे व्यवसाया बदल माहीती दिली व सावनेर येथे संकेत हॉटेल येथे देह व्यापाराचे पहिले काम मिळुन दिले. पहिल्यादा ते काम न पटल्यामुळे मुलगी व तिची बहिण घरी वापस गेले घरी येवुन विचार केल्यानंतर पैश्याची अडचण असल्यामुळे संकेत हॉटेल मधील काम करण्याचा निर्णय घेतला व काम सुरू केले. एक महिण्यापासुन मुलगी व त्याची बहिण संकेत हॉटेल मध्येच देह व्यापाराचा काम करत होते . परंतु मागील आठवडयापासुन मुलीला पोट दुखण्याचा त्रास होत असल्यामुळे मुलीने काम बंद केले होते .मंगळवार दि.१७ जानेवारी रोजी देह व्यापाराचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी मुलीच्या बहिणीची मैत्रीण हिला फोन केला असता तिने स्वराज राजु हिरोले (भाऊ) म्हणुन एका व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला. बहिणीच्या मैत्रीनी ने दिलेल्या मोबाईल नं. वर दुसर्या मुलीच्या मोबाईल फोनवरून फोन केला असता भाऊ ने कन्हान ला पोहचुन फोन करा असे सांगितले. त्याच्या सांगण्यावरून मुलगी व तिची मैत्रीण कन्हान येथे पोहचली व स्वराज राजु हिरोले (भाऊ) ने पाठवलेल्या गाडीत बसुन डीवाईन लॉज हॉटेल मध्ये ११.०० वाजता दरम्यान पोहचले . पोहोचल्या नंतर डीवाईन लॉज/हॉटेलचा कॉन्टरवर बसलेल्या माणसाने मुलीला रूम मध्ये बसायला सांगितले असता तिथे आधीच एक वयस्कर बाई बसलेली होती . बाई ने प्रती कस्टमर ४०० रु मिळतील असे सांगितले व मुलगी तयार झाली त्यानंतर लगेच बाई ने कस्टमर ला दाखवयाला आणले व तो कस्टमर मुलीच्या रूम मध्ये थांबला. असे दिवस भरात एकूण १५ कस्टमर मुलगी कड़े देह व्यापारासाठी पाठविण्यात आले. संध्याकाळी घरी जातांनी दिवस भयाचे पैसे मिळत असल्याने संध्याकाळ पर्यंत थांबुन नंतर निघुन जाणार होते परंतु त्या आधीच पोलीसांनी डिवाईन लॉज/हॉटेलवर रेड मारून कारवाई केली .

पोलीसांनी रेड मारली तेव्हा मुलगी कस्टमर सोबत रूम मध्ये होती. असे सांगितले. उपरोक्त नमुद पिडीत मुलींना पोलीस उपनिरीक्षक कुमुदिनी पाथोडे, महिला कर्मचारी पोहवा ज्योती वानखेडे , पोहवा स्वाती लोखंडे व नापोशि, अर्चना कांबळे यांचा ताब्यात दिले.

पोलीसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता रुम क्र.१ मधुन वापरलेले ४ जरुर कंपनी चे गुलाबी रंगाचे कंडोम चे फाटलेले पॉकीट तसेच सदर रूम मध्ये असलेल्या बेडवर जरुर कंपनी चे गुलाबी रंगाचे ५ सिलबंद कंडोमचे पाॅकीट , रूम क्र. २ मधुन वापरलेले ५ जरुर कंपनी चे गुलाबी रंगाचे कंडोमचे फाटलेले पॉकीट व कंडोम तसेच सदर रूम मध्ये असलेल्या बेडवर जरुर कंपनी चे गुलाबी रंगाचे ३ सिलबंद कंडोमचे पाॅकीट , रुम क्रं.३ मध्ये वापरलेले ६ जरुर कंपनी चे गुलाबी रंगाचे कंडोमचे फाटलेले पॉकीट व कंडोम तसेच सुंदर रूम मध्ये असलेल्या बेडवर जरुर कंपनी चे गुलाबी रंगाचे ६ सिलबंद कंडोमचे पाॅकीट, रुम नं. ४ मधील दिवान बेड वरून काळ्या रंगाची बेडशीट ज्यावर लाल, निळसर, पांढरे, फिक्कट विटकरी रंगामध्ये गोलाकार आकारात व झाडाचे फांदीसारखे डिझाईन असलेली असलेली बेडशीट, बेडशीटवर असलेले एकुण ९ जरुर कंपनी चे गुलाबी रंगाचे आवेष्टण असलेले कंडोम चे सिलबंद पाॅकीट तसेच बेडशीटवर असलेला एक फिक्कट कथ्थ्या रंगाचा टॉप व नेव्ही ब्लयू रंगाचा जिंस च्या कपड्याचा हाफ पैंट ज्यावर इंग्रजी मध्ये SUMMER HOLIDAY लिहलेले , तसेच वापरलेले २५ जरुर कंपनी चे गुलाबी रंगाचे कंडोमचे फाटलेले पॉकीट व कंडोम, रुम क्रं.५ मधुन वापरलेले ४ जरुर कंपनी चे गुलाबी रंगाचे कंडोमचे फाटलेले. पॉकीट व कंडोम तसेच सदर रूम मध्ये असलेल्या बेडवर जरुर कंपनी चे गुलाबी रंगाचे ५ सिलबंद कंडोमचे पाॅकीट तसेच आरोपी नामे माणिक शामराव भोवते हयाच्या ताब्यातुन बोगस ग्राहकां कडुन स्विकारलेल्या नोटां ५०० रुपये दराची १ नोट नंबर ६डब्लुएल००५५३६₹ २०० रूपये दराची 1 नोट नंबर ओ.एच. ए २५११४६ आणि १०० रूपये दराच्या ५ नोटा नंबर १सीएन८३०५६७.१सीएन८३०५६८ ,१सीएन८३०५७९ , १सीएन८३०५७० , १सीएन८३०५७१असे एकूण १२००/-रुपये , कॅश काऊंटर वरुन जरुर कंपनी चे ६ ३०-१८० लिहलेले एकूण ५ कंडोम चे बॉक्सेस, तसेच कॅश काऊंटर वर पोपटी रंगाच्या बीईएन १० लिहलेल्या बॉक्स मध्ये गुलाबी रंगाचें जरुर कंपनीचे कंडोम सिलबंद ८ नग व निळ्या रंगाचे १०० मिलीचे पराशुट कंपनीच्या तेलाची प्लास्टीक बॉटल १नग, कॅश काऊंटरच्या स्वास्तीकचा निशान असलेल्या ड्रायर मध्ये लाल रंगाचे गोलाकार टोकन ज्यावर गोल्डन रंगामध्ये अंकात प्रिंट असलेले एकूण ५७ नग, तसेच केसरी रंगाचे गोलाकार टोकन ज्यावर गोल्डन रंगामध्ये अंकात प्रिंट असलेले एकुण ५० नग, एअर लाईन कंपनीची पिवळ्या रंगाची गिटार असलेली निळसर पांढऱ्या रंगाची हिशोब वही ज्याच्यात दिनांक २३/१२/२०२२ पासुन १७/१/२०२३ पर्यंत हिशोब लिहलेली वही १ नग, पिवळसर रंगाची ज्यावर दिनांक ३०/१२/२२ मंगळवार से चालु असे पेनाने लिहलेली डिवाईन लॉजिंग आणि बोर्डींग चे इंट्री रजिस्टर- १ नग, कथ्थ्या रंगाची पॉकीट नोटबुक २१० लिहलेली हिशोब नोंदवही -१ नग, Paytm accepted here लिहलेनेOR CODE. ०१ नग व Paytm accepted here लिहलेले फोन पे मशीन-१ नग. फोन पे लिहलेले क्यु आर कोड ३ नग व फोन पे लिहलेले मशीन-१ नग, आरोपीने कॅश काऊंटर टेबल मधुन आज आलेल्या ग्राहकांन कडुन जमा झालेली एकूण रक्कम २५२८९/-रु आरोपी नाम माणिक शामरावजी भोवते याचे जवळुन (१) ओप्पो कंपनीचा ए-५७. मॉडेल नं. सीपीएच२३८७ पिवळ्या गोल्डन रंगाचा मोबाईल फोन एक नग क्रमांक ९६३७३६०९९६ त्याचा आयएमईआय नंबर८६३५८१०६४६९८१७३, ८६३५८१०६४६९८१६५ असा किमती अंदाजे १०,०००/- रू. ग्राहक अटेंड करण्या करिता ग्राहका कडुन मिळालेले लाल टोकन एकुण १३ नग पिडीत मुलगी हिच्या कडुन जप्त करण्यात आले. तसेच ग्राहक अटेंड करण्या करिता ग्राहका कडुन मिळालेले लाल टोकन एकूण – १४ नग पिडीत मुलगी कडुन जप्त करयात आले असा एकूण असा एकुण ३५,२८९/- रुपयांचा मुद्देमाल आणि बोगस ग्राहका कडुन स्विकारलेले एकूण १२००/- रु सविस्तर दोन पंचा समक्ष जती पंचनाम्या प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेतले .

सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक नागपुर ग्रामीण चे सहायक पोलीस निरीक्षक मिरा अनिल मटाके यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी १) माणिक शामराव भोवते २) स्वराज राजु हिरोले ३) पिडित महिला यांच्या विरुद्ध कलम ३,४,५ अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम १९५९ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

सदर कारवाई अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक नागपुर ग्रामीण चे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी , पोलीस उपनिरीक्षक मिरा मटाले , पोलीस उपनिरीक्षक कुमुदिनी पाथोडे ,पोलीस हवालदार ज्योती वानखेडे , नापोशि अर्चना कांबळे , पोलीस हवालदार स्वाती लोखंडे , नापोशि गजेन्द्र निबेकर , पोशी प्रफुल भातुलकर , पोहवा आसिफ सैय्यद सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्थानिकांचे आपातकालीन परिस्थितीत सहकार्य अपेक्षित , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित शिबिराचा 10 वा दिवस

Thu Jan 19 , 2023
नागपूर – नैसर्गिक आपत्तीची माहिती देण्यासाठी व सामना करण्यासाठी आपदा मित्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. 12 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा आज दहावा दिवस आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनात सुरु असलेल्या या प्रशिक्षणात पुरपरिस्थिती व आपातकालीन परिस्थितीबाबत आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोबतच राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com