अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज योजनेचा प्रस्ताव तयार करावा – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई :- अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

अल्पसंख्याक विकास मंत्री सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली.

मंत्री सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये चर्चासत्राचे आयोजन करून त्या माध्यमातून समस्या जाणून घ्याव्यात व त्यानुसार नवीन योजनाबाबतचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. या समाजातील नागरिकांसाठी नवीन विविध योजना तयार करुन त्या माध्यमातून समाजाचा विकास करण्याचा मानस आहे. मंत्री सत्तार यांनी या बैठकीत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेवून समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध मुद्दयांवर चर्चा केली.

या बैठकीस मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो.बा. ताशिलदार तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काॅगेसच्या जनसंवाद यात्रेत जुन्या पेन्शनची मागणी

Sat Sep 9 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या संकल्प नेतुन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेशी सुसंवाद साधण्याच्या सुरु केलेल्या ‘जन संवाद यात्रेत’ (दि. ८) कन्हान येथे जुनी पेन्शनचा नारा गुंजला. तारसा चौक कन्हान येथे शुक्रवार (दि.८) काॅगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा पोहचली. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यां तर्फे एकच मिशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com