काॅगेसच्या जनसंवाद यात्रेत जुन्या पेन्शनची मागणी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या संकल्प नेतुन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेशी सुसंवाद साधण्याच्या सुरु केलेल्या ‘जन संवाद यात्रेत’ (दि. ८) कन्हान येथे जुनी पेन्शनचा नारा गुंजला.

तारसा चौक कन्हान येथे शुक्रवार (दि.८) काॅगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा पोहचली. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यां तर्फे एकच मिशन जुनी पेन्शन चा नारा देण्यात आला. तद्नंतर काॅगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जुनी पेन्शन लढ्यातील शिलेदारांना बोलावुन त्यांच्या सोबत जुनी पेन्शनच्या मागणीवर चर्चा केली. काॅगेस पक्षाने ज्या प्रकारे इतर राज्यात जुनी पेन्शन लागु केली तशीच महाराष्ट्रात सत्ता आल्या वर लागु करु असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. जुनी पेन्शन लढ्याचे नेतृत्व माधव काठोके यांनी केले. यावेळी माधव काठोके, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपुर विभागीय सचिव खिमेश बढिये, जिल्हा संघटक राजेंद्र खंडाईत, ग्रामीण जिल्हा संघटक गणेश खोब्रागडे, महिला संघटिका प्रणाली रंगारी, अमित मेंघरे, पारशिवनी तालुका संघटक जितेंद्र भांडेकर, संजय डहाके,  सतीश कुथे, विलास उईके, ज्ञानेश्वर कामडी, गौरीशंकर साठवणे, नरेश तेलकापल्लीवार, किशोर जिभकाटे, राजु भस्मे, भिमराव शिंदेमेश्राम, दिनेश ढगे, एस. एस. बेलनकर, प्रशांत वैद्य, विशाखा ठमके, गीता वंजारी, अभिषेक मोहनकर, भास्कर सातपुते, आयशा अंसारी, ज्ञानप्रकाश यादव, श्रीकांत पेटकर, लता पेटकर, रुपाली उके, वनिता घोडेस्वार, हरिहर डहारे,  संजय आहाके, सुभाष मदनकर, रविकांत गेडाम यांच्यासह अनेक जुनी पेन्शन लढ्यातील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदार जागृतीसंबंधी पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते 11 सप्टेंबर रोजी प्रकाशन

Sat Sep 9 , 2023
मुंबई :- मतदार जागृतीचा उपक्रम म्हणून ‘आगम’ या सामाजिक संस्थेने किशोर आणि युवा पिढीला भारतातील निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व याची माहिती देण्यासाठी ‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक! (Me The Superhero Indian Citizen!)’ हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दि.11 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वा. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मतदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com