ट्रक च्या धडकेने अल्पवयीन मुलाचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील खूषबू मोटर्स जवळ एका अज्ञात ट्रक च्या धडकेने 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा जागीच मरण पावल्याची दुःखद घटना आज सायंकाळी साडे सात दरम्यान घडली असून मृतक मुलाचे नाव प्रथमेश मोहन बुरबादे वय 17 वर्षे रा आदर्श नगर रणाळा कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत त्वरित मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अज्ञात ट्रक चा शोध घेणे सुरू आहे तर या अपघाती मृत्यू घटनेने मृतक प्रथमेशच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘गो-ग्रीन’ पर्याय स्विकारीत विदर्भातील 53 हजारावर वीज ग्राहक झाले पेपरलेस

Thu Sep 21 , 2023
नागपूर :- महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या संपूर्ण विदर्भातील 53 हजार 478 ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदा ऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com