कुलरच्या विद्दूत धक्क्याने विवाहित तरुणाचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वडोदा गावातील 31 वर्षीय रहिवासी तरुणाचा घरच्या कुलर मध्ये पाणी भरत असताना लागलेल्या विद्दूत धक्क्याने दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना गतरात्री घडली असून मृतक तरुणाचे नाव रुपेश चंद्रभान झंझाळ असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा विवाहित असून कुटुंबातील एकटाच कर्ता व्यक्ती होता नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून घरी जेवन करून रात्री साडे दहा वाजता घरातील कुलर मध्ये पाणी भरत असता अचानक कुलर चा विद्दूत शॉक लागल्याने जागीच खाली पडल्याची घटना घडली असता त्वरित उपचारार्थ नजीकच्या गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले होते मात्र तोवर डॉक्टरने मृत्यूची घोषणा केल्याने सर्वाना एकच धक्का बसला व मृतकाच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला.पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाच्या पश्चात आई शिला चंद्रभान झंझाळ वय 60 वर्षे ,दोन विवाहित बहिणी व पत्नी प्रिया झंझाळ वय 27 वर्षे व 3 वर्षा ची मुलगी आहे.या घटनेने वडोदा गावात शोककळा पसरली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाभार्थ्याना पाच वर्षांमध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार

Mon Jul 10 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना कामठी :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना राबविण्यात येते या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्या नंतर एप्रिल ते जुन या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता मात्र 50 वर्षावरील ज्येष्ठ ,वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com