गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक

– 12 माओवाद्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश 

– अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त

 गडचिरोली :- छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात 12-15 माओवादी तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले ज्यामध्ये Dy SP Ops च्या नेतृत्वाखाली सात C-60 पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवण्यात आले.

त्यावेळी सदर परिसरात दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत 06 तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता. त्यानंतर परिसरात केलेल्या शोध अभियानात आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच आतापर्यंत 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 07 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मृत माओवाद्यांपैकी एक ओळख पटली असून तो टिपागड दलमचा प्रभारी DVCM लक्ष्मण आत्राम @ विशाल आत्राम,असल्याची माहिती मिळाली माओवाद्यांची पुढील ओळख आणि परिसरात शोध सुरू आहे.

C-60 चे एक पोलीस उप निरीक्षक आणि एक जवान हे गोळी लागून जखमी झाले आहेत . ते धोक्याबाहेर असून त्यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री गडचिरोली यांनी वरील यशस्वी मोठ्या अभियानासाठी C60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सामान्य लोकांच्या जलद न्यायासाठी पोलीस विभागाच्या अत्याधुनिकरणावर भर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Jul 18 , 2024
▪ नागपूर येथे अत्याधुनिक कमांड अँड कंट्रोल सेंटर’चे लोकार्पण ▪ नागपूर महानगरात 1200 किलो मीटर अंतराच्या ऑप्टीक फायबर केबलच्या माध्यमातून सुमारे 5800 कॅमेऱ्याद्वारे निगराणी ▪ आता कानूनचे हातच नव्हे तर डोळेही अधिक सक्षम ▪ गुन्हेगारांच्या चेहऱ्यांसह आवाजाचीही होणार तत्काळ पडताळणी नागपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत आपण इंग्रजांनी लादलेल्या कायद्याच्या अंमलाखाली न्यायाची प्रतिक्षा केली. हे कायदे बदलले तरच सर्व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!