– गोंही जवळील घटना
– लहान विद्यार्थी जखमी
काटोल :- तालुक्यातील सोनोली आणि मेंडकी येथील विद्यार्थी नेहमी प्रमाणे खाजगी ओमनी गाडीने काटोल येथील शाळेत सकाळी 8 च्या सुमारास गावातून घेऊन जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या हेरीयर गाडीच्या चालकाने ओमनीला समोरासमोर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ओमनी गाडीचा समोरचा भाग चकनाचुर झाला. ओमनी चालक सलमान शेख रा. सोनोली यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना जबर मार लागला आहे. याशिवाय ओमनी गाडी मध्ये सोनाली आणि मेंडकी येथील 11 च्या जवळपास मुले मुली होते. त्यातील कु. आयांशी निलेश बुजरूक वय 5 वर्षे, सानवी हर्षल महाजन वय 5 वर्षे, विहान अमोल जराळे वय 5 वर्षे, श्रुत आशिष महाजन वय 4 वर्षे, हे सर्व रा. सोनोली तर क्रिस्टी योगेश कुकडे वय 6, निधी विलास काळे वय 5 वर्षे, रा. मेंडकी यांना जास्त मार लागल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात भरती केले असून उपचार सुरू आहे. तसेच सारांश कपिल धमदे वय 6 वर्षे , प्रणिश निलेश शिपाई वय 6 वर्षे, सात्विक आशिष शिपाई वय 7 वर्षे, युग सुनील धमदे वय 6 वर्षे सर्व रा. मेंडकी, उदित सुनील कुकडे वय 5 वर्षे रा. मेंडकी यांना मुका मार लागल्याने काटोल येथे उपचार सुरू आहे.
टाटा हैरियर कार क्र. एमएच 40 बीजे 6398 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील कार घुबडमेट ते सावरगाव रोडने भरधाव वेगाने व निष्काळजीपने चालवत आणून काटोलकडे शाळेचे मुले घेवून असलेल्या ओमनी कार गाडी क्र. एमएच 35 पी 2579 ला समोरासमोर धडक दिली. फिर्यादी सुनील ईश्वर धुंदे, यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी टाटा हैरियर कार चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
– पाच ते सहा आंबूलन्स मधून विद्यार्थ्यांना नागपूर ला पाठविण्यात आले.
जखमी विद्यार्थ्यांना डॉ. अंबाडकर, डॉ. चिंचे, डॉ. वानखेडे व ग्रामीण रुग्णालय काटोल येथे विद्यार्थ्यांना नेवुन प्राथमिक उपचार करण्यात आला. व तेथून सरळ नागपूर ला हलविण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य समीर उमप, माजी उपसभापती अनुप खराडे, माजी नगरसेवक किशोर गाढवे, गणेश सावरकर, गणेश चन्ने यांनी आंबूलन्स व तात्काळ उपचार व्हावा याकरिता धावपळ केली.