कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथून जवळच असणाऱ्या इंदोरा येथील दसरा मैदानात नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे उद्या शनिवारी 12 ऑक्टोबरला दसरा उत्सव, देवी विसर्जन ,रावण दहन झाकीसह शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे .श्रीकृष्ण ग्रुप उज्जैन या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान गट ग्रामपंचायत इंदोराचे सरपंच नेकसिंग गहेरवार सह समस्त ग्रामवासीयांनी केले आहे.