चंद्रपूर :- जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचा शानदार समारोप काल २६ फेब्रुवारी सायंकाळी सैनिकी शाळा, विसापुर येथे पार पडला. स्पर्धेदरम्यान नगर परिषद ब्रह्मपुरी क्रीडा तर चंद्रपूर मनपा सांस्कृतीक चॅम्पीयन ठरले.
महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन दि.२४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान सैनिकी शाळा विसापूर येथे करण्यात आले होते. यात व्हाॅलिबाॅल, क्रिकेट,,४०० मीटर रिले रेस, १०० मीटर रनिंग,चेस,कॅरम, बॅडमिंटन स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. सर्वच नगर परिषदांनी सक्रिय सहभागाबरोबरच पारितोषिके पटकावली. सर्व नगर परीषद मुख्याधिकारी यांनी पुढाकार घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत केले.
या महोत्सवाची संकल्पना मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा प्रशासन अधिकारी अजित डोके यांनी मांडली होती. कल्पना ते प्रत्यक्ष आयोजन यात २० दिवसांचा उणापुरा कालावधी मिळुनही स्पर्धेचे नियोजन उत्कृष्ट झाले. राजुरा, वरोरा,भद्रावती, चिमुर, घुग्गुस, ब्रम्हपुरी,जिवती, सावली, कोरपना, सिंदेवाही, गडचांदूर,नागभीड, पोंभुर्णा,गोंडपिंपरी,मुल, भिसी, बल्लारपूर नगरपरिषद, चंद्रपूर मनपा येथील कर्मचाऱ्यांनी चढाओढीने भाग घेतला. नगर परिषद बल्लारपूर यांनी स्पर्धेसाठी कार्यान्वीत यंत्रणा म्हणुन चांगले कार्य केले.
सर्व स्पर्धकांसाठी नाश्ता, चहा,दोन्ही वेळचे जेवण, पाणी इत्यादींची व्यवस्था चोख ठेवण्यात आली व स्पर्धकांना राहण्याची व्यवस्था चंद्रपूर येथे करण्यात आली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांनी स्पर्धक म्हणून जो सहभाग घेतला आणि ज्या खिलाडूवृत्तीने खेळ दाखवला तो अप्रतिम होता. पुढील वर्षीचे आयोजन भद्रावती नगरपालिकेकडुन केले जाणार आहे.
स्पर्धेच्या समारोप प्रसंगी विभागीय सहआयुक्त संघमित्रा ढोके व शहरी प्रशासकीय सेवा संघटना उपायुक्त सुनील बल्लाळ यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा आयोजीत करण्याच्या आवश्यकतेची माहीती सांगितली तसेच दरवर्षी कार्यक्रम आयोजीत करण्याची इच्छा प्रकट केली. यावेळी आयुक्त विपीन पालीवाल व सर्व मुख्याधिकारी यांनी गायलेल्या गाण्यावर सर्व कर्मचाऱ्यांनी ताल धरला.३ दिवसीय महोत्सवानंतर सैनिकी शाळेचा संपुर्ण परिसर चंद्रपूर मनपाद्वारे स्वच्छ करून देण्यात आला.
बल्लारपुर मुख्याधिकारी विशाल वाघ, ब्रह्मपुरी मुख्याधिकारी अर्शिया शेख, वरोरा मुख्याधिकारी गजानन भोयर, पोंभुर्ना मुख्याधिकारी, आशिष घोडे, मूल मुख्याधिकारी अजय पाटनकर, घुग्घुस मुख्याधिकारी जीतेन्द्र गादेवार, भद्रावती/ गडचांदुर मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेलकी, नागभिड मुख्याधिकारी राहुल कंकाल, भद्रावती उपमुख्याधिकारी जगदीश गायकवाड व इतर सर्व नगर परिषद यांचे मुख्याधिकारी यांनी महोत्सव यशस्वी करण्यास विशेष प्रयत्न घेतले.
खेळ व विजेते :
१. क्रिकेट – विजेता,मनपा, चंद्रपूर
उपविजेता, बल्लारपूर, न.प.
२. बॅडमिंटन एकेरी ( महिला ) – प्रथम, आर्शिया जुही,ब्रह्मपुरी न.प.
बॅडमिंटन एकेरी ( पुरुष ) – प्रथम, गोविंद जक्केडवार चिमूर न.प.
बॅडमिंटन दुहेरी (महिला ) – प्रथम, आर्शिया जुही,योगिता निंबाते,ब्रह्मपुरी न.प.
बॅडमिंटन दुहेरी ( दुहेरी ) – विनोद कांबळे व निलेश सरोगे, वरोरा न.प.
बॅडमिंटन दुहेरी (मिक्स ) – अर्शिया जुही, प्रवीण कांबळे ब्रह्मपुरी न.प.
३. १०० मीटर रनिंग ( पुरुष ) – प्रथम – राहुल पंचबुद्धे, मनपा, चंद्रपूर
१०० मीटर रनिंग (महिला ) – प्रथम – मोनाली वांढरे, भद्रावती न.प.
४. ४५ वर्षावरील १०० मीटर रनिंग ( पुरुष ) – प्रथम, वसंत मोहुर्ले, मूल न.प.
४५ वर्षावरील १०० मीटर रनिंग (महिला ) – प्रथम, बबिता उईके, मनपा, चंद्रपूर
५. ४०० मीटर रिले पुरुष – प्रथम – मूल नगर परिषद
द्वितीय – चंद्रपूर मनपा
६. ४०० मीटर रिले महिला – प्रथम, राजुरा नगर परिषद
द्वितीय, भद्रावती नगरपरिषद
७. व्हाॅलिबाॅल – प्रथम – चिमुर नगर परिषद
व्हाॅलिबाॅल – द्वितीय – ब्रह्मपुरी न.प.
८. कॅरम – एकेरी (पुरुष ) – प्रथम – आकाश मलिक, मनपा चंद्रपूर
कॅरम – एकेरी (महिला ) प्रथम – पूजा रगडे, ब्रह्मपुरी न.प.
कॅरम – दुहेरी (पुरुष ) – प्रथम -आकाश मलिक व प्रतिक खोटे, मनपा चंद्रपूर
कॅरम – दुहेरी (महिला ) द्वितीय – अर्शिया जुही व पूजा रगडे, ब्रह्मपुरी न.प.
९. चेस (पुरुष ) – प्रथम – आकाश पंदीलवार,चिमूर न.प.
चेस (महिला ) – प्रथम – अर्शिया जुही, ब्रह्मपुरी न.प.