देशाच्या राष्ट्रीय कोळसा निर्देशांकात डिसेंबर, 2023 मध्ये 4.75% ची घसरण

नवी दिल्ली :- देशाच्या राष्ट्रीय कोळसा निर्देशांकामध्ये (तात्पुरत्या) डिसेंबर 2023 मध्ये 4.75% ची लक्षणीय घसरण झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये 163.19 अंकांवर असलेला हा निर्देशांक डिसेंबर 2023 मध्ये 155.44 झाला आहे. निर्देशांकातील ही उल्लेखनीय घसरण कोळशाच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी देशात कोळशाचा पुरेसा साठा असल्याचे दर्शवते

राष्ट्रीय कोळसा निर्देशांक (एनसीआय) हा एक दर निर्देशांक असून तो अधिसूचित दर, लिलाव दर तसेच आयात दरांसह सर्व विक्री माध्यमातील कोळशाचे दर एकत्रित करतो. यामध्ये कोकिंग तसेच बिगर-कोकिंग सह इतर सर्व कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या आणि नियमित (उर्जा आणि खत क्षेत्र) आणि अनियमित क्षेत्रात हस्तांतरित होणाऱ्या विविध श्रेणींच्या कोळशांच्या किंमती विचारात घेण्यात येतात.

यासाठी वित्तीय वर्ष 2017-18 हे आधार वर्ष मानून स्थापण्यात आलेला हा एनसीआय बाजाराच्या गतिमानतेचा एक विश्वासार्ह सूचक म्हणून हा काम करतो आणि किंमतीतील चढउतारांबद्दल महत्वाची अंतर्दृष्टी प्रदान करतो.

जून 2022 मध्ये एनसीआय सर्वोच्च पातळीवर होता त्यावेळी हा निर्देशांक 238.83 अंकांवर पोहोचला होता. परंतु त्यानंतरच्या महिन्यांमध्ये या निर्देशांकात घसरण झाली. ही घसरण भारतीय बाजारपेठेत मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध असल्याची सूचक आहे.

त्याशिवाय, कोळशाच्या लिलावावरील प्रिमियम या उद्योगाची नस दर्शवते तसेच कोळसा लिलाव प्रिमियम मधील तीव्र घसरण बाजारपेठेत पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध असल्याचे द्योतक असते.गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत यावर्षी डिसेंबर महिन्यात देशाच्या कोळसा उत्पादनात झालेली 10.74%ची भरीव वाढ देशात कोळशावर अवलंबून असलेल्या विविध क्षेत्रांना कोळशाचा नियमित पुरवठा सुनिश्चित करून देशाच्या एकंदर उर्जा सुरक्षेमध्ये योगदान देते.

एनसीआय च्या घसरणीचा कल मागणी तसेच पुरवठा यांच्या गतिमानतेमध्ये सुसंवाद स्थापित करणाऱ्या अधिक समतोल बाजारपेठेचे निदर्शक आहे. कोळशाच्या पुरेशा उपलब्धतेसह देश कोळशाची सतत वाढती मागणी तर पूर्ण करेलच पण त्याचसोबत, दीर्घकालीन उर्जाविषयक गरजांसाठी उपयुक्त ठरेल आणि त्यायोगे, अधिक लवचिक आणि शाश्वत कोळसा उद्योगाला सशक्त करून देशासाठी अधिक समृद्ध भविष्याची जोपासना करेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १८८६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता

Thu Feb 15 , 2024
– विकासकामे जलदगतीने पूर्ण करावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई :- नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १८८६.९१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महानगर प्रदेशातील २५ गावांकरीता अमृत टप्पा दोन मधून मलनिस्स:रणासाठी सुमारे ७१६ कोटी खर्चाच्या वाहिनीच्या कामाचा समावेश आहे. ही विकासकामे जलदगतीने पूर्ण करावी, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!