दिवाळीत मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये लागली स्पर्धा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर शहरात इच्छुकांनी दिवाळी सणाचे निमित्त साधुन आपल्या उमेदवारिची चाहूल दिली आहे.इच्छुकांमध्ये आपल्या प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत दिवाळीपूर्वी पोहोचण्याची जणू काही स्पर्धाच लागली होती. दररोज शुभेच्छापत्र पहायला मिळत आहेत.

निवडणुका संदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची घोषणा होण्याची शक्यता नाही. मागील 23महिन्यापासून शहरातील नगर पालिकेवर प्रशासक राज सुरु आहे.तरीही कधीही निवडणूक लागली तर आपण मागे पडू नये यासाठी काही इच्छुक उमेदवार सदैव तत्पर असल्याचे पहायला मिळत आहे.अजून प्रत्यक्ष निवडणूक कधी होईल हे जरी स्पष्ट नसले तरी संभाव्य उमेदवारांच्या या चढाओढीकडे मतदार मात्र एका वेगळ्याच नजरेने बघत आहे.

– पार्ट्या बंद झाल्याने इच्छुकांच्या स्पर्धामध्ये नाराजी

– नगर परिषदेच्या निवडणुका डिसेंबर 2021 मध्ये होणे अपेक्षित होते परंतु विविध कारणामुळे निवडणूक लांबणीवर पडत आहे परंतु मागील वर्षीपासून निवडणूक लढू इच्छिणाऱ्यानी निवडणूक लवकर होतील या अनुषंगाने खर्च सुरू केला होता, पार्टी देण्याचे प्रमाणही वाढले होते परंतु निवडणूक लांबणीवर पडत असल्याने निवडणुकीसाठी लागणारा खर्च वाढतच चालला आहे त्यात निवडणूक कधी होणार हे निश्चित नाही त्यामुळे काही इच्छुकांनी आर्थिक खर्चावर लगाम घातला आहे त्यामुळे त्यांच्या समर्थकातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

NewsToday24x7

Next Post

कुही हद्दीत धाबा मालकाचा खून करून पसार होणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

Wed Nov 15 , 2023
नागपूर :- कुही हद्दीत कुही फाटा राजु ढाबा येथे दि. ११/११/२०२३ रोजी यातील फिर्यादी विजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे हा दिड ते दोन महीण्या पासुन राजु हेंगरे यांच्या ढाबावर भांडे धुण्याचे काम करीत असे व तेथे जेवन करून राहत असे व फिर्यादी सोबत आरोपी मंडला उर्फ छोटु वय ३५ ते ३६ वर्ष हा ढाब्यावर पोळया करण्याचे व वेटर चे काम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com