संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शासनाकडून संजय गांधी निराधार योजने अंतर्गत दिव्यागाना मिळणारे मानधन कायम राहावे यासाठी संबंधित विभागाकडून लाभार्थ्यांचे हयात असल्याचे प्रमाणपत्र मागविण्यात येत आहेत त्यातच दिव्यांग लाभार्थी हे हयात असल्याचे प्रमाणपत्र पोहोच करण्यासाठी आले असता या कार्यालयात दिव्यांगाना प्रवेश करण्यासाठी रॅम्प ची सुविधा तर आहे मात्र ती फक्त नामधारी.तसेच तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराहुन कागदपत्र जमा करण्यात येणारे कार्यालय खोली क्र 6 दूर असल्याने दिव्यांग लाभार्थ्यांना चढून जाणे शक्य होत नसल्याने एक प्रकारे कुचंबणाच होत आहे तेव्हा दिव्यांग लाभार्थ्यांची ही बोळवण थांबविण्याच्या मागणीतून दिव्यांग लाभार्थ्यांचे हयात असलेले प्रमाणपत्र घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार जवळच एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून दिव्यांग लाभार्थ्यांचे हयात असल्याचे प्रमाणपत्र जमा करण्यात यावे या मागणीसाठी आज ‘संघर्ष साथी दिव्यांग जण कल्याणकारी संस्थाद्वारा कामठी तहसीलदार अक्षय पोयाम ला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.यावर तहसीलदार ने समस्त नीवेदनकर्त्याना मागणी पूर्ण करण्याचे आश्वस्त केले.
याप्रसंगी नागेश ढोके,राजेंद्र इंगळे, सोनू गजभिये,देवदास साहू,भोलाशंकर डायरे,नदीम अहमद, शाहरुख खान,शेख इरफान,रमेश पाटील,भीमराव पाटील,मो इमरान,अमित राऊत,मूलचंद बोरकुटे,सुनील टाहणे,ममता यादव,श्रद्धा यादव प्रामुख्याने उपस्थित होते.