अवैधरित्या रेतीची चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीताविरूध्द गुन्हा नोंद

– नागपुर ग्रामीण खापा पोलीसांची कारवाई

खापा :- खापा पोलीस हददीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मौजा चारगाव जवळ राजस्व विभागाच्या अत्यारित असलेल्या खैरी नाल्या जवळा काही इसम अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतुक करत आहे. अश्या मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस पंचासह जात असतांना सिरोजी ते बडेगाव प्रजीमा या कच्च्या रोडवर एक ट्रॅक्टर ट्रॉली सह दिसला पोलीसांनी त्यां ट्रॅक्टर ला थांबवण्याचा प्रयत्न केला असाता, ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर ट्रॉली रोडच्या कडेला लावुन तो ट्रॅक्टर वर हजर असलेल्या त्याच्या २ साथीदारासह तेथुन झुडपी जंगलात पळुन गेला. पोलीसांनी ट्रॅक्टर ची पाहणी केली असता त्यात १) १ ब्रास रेती किंमत ४०००/- रूपये २) तीन फावडे किमंत ३००/- रू, ३) ३ घमेले किंमत ३००/- रू व एक लाल रंगाचा महीद्रा ५७५ डी आय मॉडलचा बिना कंमाकाचा ट्रॅक्टर किंमत ४,००,०००/- रूपये ४) विना नंबर ची ट्रॉली कीमत १,००,०००/- रूपये असा एकुण ५,०४,६०० रूपयाचा मुददेमाल जप्त केला. अज्ञात आरोपीतांविरूध्द पोस्टे खापा येथे कलम ३०३(२), ३ (५), वि.एन.एस २०२३, ४८ (७),४८(८) म.ज.म.स.१९६६, ३ सार्वजनीक संपत्ती नुकसान प्रतीबंधक अधिनीयम १९८४, कलम ४,२१, खाण आणी खनिज अधि १९५७, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सदरची कार्यवाही हर्ष ए. पोदार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, अनिल म्हस्के (भा.पो.से) उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग तथा सहायक पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे खापा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक विशाल गिरी व पोउपनि जंगम, पोलीस अंमलदार बटाउवाले यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैधरित्या जुगार खेळणा-या आरोपीवर कारवाई, ६ आरोपी व ६ मोटर सायकलसह एकूण ४,७७,८९०/-रू चा मुद्देमाल जप्त

Thu Oct 3 , 2024
नागपूर :- पोलीस स्टेशन मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, टेपसना शिवार ता. कामठी येथील पडीत शेत शिवारात काही लोक ५२ तासपत्तयावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. यावरून त्वरीत पोलीस स्टेशन मौदा येथील अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने जुगार रेड केला असता जुगार खेळणारे आरोपी नामे १) नविन संतोष वाकले वय ३५ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com