– न्यायालयात जाणार- सुषमा अंधारे
नागपूर :- संकेत बावनकुळे हा लाहोरी रेस्टारेंटमध्ये मसाले दुध प्यायला गेला होता आणि त्याचे मित्र दारू प्यायला. मसाले दुध पिलेल्या व्यक्तीने आपल्या अडीच कोटींच्या गाडीची चावी प्रचंड दारू पिलेल्या मित्रांच्या हाती दिली. ही नव्हे काय? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणात संकेतला आरोपी करावे त्याच्यावर गुन्हा नोंदवावा. ते होणार नसेल तर मला वेगळी कायदेशिर प्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी न्यायालयात जाणार, अशी माहिती शिवसेनेच्या (उबाठा) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी सकाळी प्रसार माध्यमांना दिली.
अंधारे यांनी बुधवारी सकाळी सीताबर्डी पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिसांकडून माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला.
यावेळी अंधारे यांनी सलमान खान प्रकरणाची आठवण करून दिली. न्यायालयाचा निर्णयही सांगितला. एखादी व्यक्ती गाडी चालवत नसेल परंतू तिच्यामुळे अपघात झाला आहे. तसेच एखाद्या कंपनीत कामगाराचा मृत्यू झाल्यास भलेही तो मशिनरी चालवत नसेल तरी सुध्दा कंपनी मालकावर गुन्हा दाखल होतो. या न्यायानुसार संकेत बावनकुळेवर गुन्हा दाखल व्हायला हवा. परंतू पोलिस गुन्हा दाखल करणार नाही. बावनकुळे खरंच ते कायद्याचे धनी आणि निष्पक्ष तपास व्हावा असे वाटत असेल तर गृहमंत्र्यांनी पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना संकेतवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
नागपुरात अजून एक घटना समोर आली. जंगालात एका तरुणीचा मृतदेह पुरण्यात आला. याही प्रकरणात पुराव्याशी छेडछाड केली. संकेतच्या प्रकरणातही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. म्हणून त्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनाही सहआरोपी करण्यात यावे. त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत.
फिर्यादी जितेंद्र सोनकांबळेवर प्रचंड दबाव
फिर्यादी जितेंद्र सोनकांबळेनी तक्रार मागे घेतली, अशी अफवा पसरवून त्यांच्यावर प्रचंड आणन्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे फिर्यादी काहीही बोलले नाही. माध्यमांसमोर आले नाहीत. ते का समोर येवू शकत नाही. ते कुठल्या दडपणाखाली आहेत. मला त्यांच्या जीवाची चिंता आहे. त्यांना पोलिस प्रोटेक्शन असावे.