अमरदिप बडगे, प्रतिनिधी
वैद्यकीय महाविद्यालय चौकशी दरम्यान बाब समोर आली..
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील डॉक्टरच्या हलगर्जीपणा मुळे एका महीलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना 20 मे झाली होती. घडली मृतक महिलांचे पती ईशान भुरे यांनी असा आरोप देखील केला होता.
तिरोडा तालुक्यातील रमा भुरे राहणार तिरोडा या महिलेचा प्रसुती करिता उपजिल्हा रुग्णालयात 19 मे नेण्यात आले होते. त्याना तिरोडा येथील खासगी सुशील रहांगडाले यांच्या दवाखान्यात दाखल करायला सांगितले दाखल सदर महिलेवर 19मे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनतर 20 मे ला सकाळी प्रकृती खराब झाल्याने तिला राधेकृष्ण हास्पीटल गोंदिया येथे हलविण्यात आले होते उपचारादरम्यान रमा भुरे महिलेचा दुदैवी मृत्यू झाला होता. यामध्ये तिरोडा येथील डॉ सायास केंद्रे व डॉ.सुशील रहांगडाले यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची बाब सदर महिलेच्या पतीने केली होती. मृतक महिलेचा पती ईशांत भुरे यांनी केली होती यापकरणी गोंदिया शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार सुध्दा दाखल करण्यात आली होती.सदर प्रकरणाची वैद्यकीय चौकशी करून डॉ सायास केंद्रे व डॉ सुशील रहांगडाले यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची बाब सदर वैद्यकीय महाविद्यालयअहवाल दिसून आली. यामध्ये डॉक्टर श्रीकांत मेश्राम , डॉ राजश्री पाटील , डॉ विपुल अंबुले, डॉ नंदकिशोर जायसवाल अशा 4 डॉक्टराची चमू गठीत करण्यात आली होती. तिरोडा पोलीस स्टेशनला सदर दोन्ही डाक्टरवर भादवी कलम 304 अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या कारवाईमुळे मात्र वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.