कन्हान :- अंतर्गत ०१ कि. मी. अंतरावरील फिर्यादीचे रहाते घराजवळून जवाहर नगर कन्हान येथे दिनांक १४/०७/२०२३ चे १५.०० वा. ते १६.०० वा. दरम्यान फिर्यादी रोहीत सिद्धार्थ मानवटकर, वय ३० वर्ष रा. प्रभाग क्र. ४ जवाहर नगर कन्हान जि. नागपूर हा घर बांधकामाचे मजुरीचे काम करतो. कामाने लांब जावे लागत असल्याने फिर्यादी यांनी सन २०१६ मध्ये अॅक्टीवा 3G दुचाकी मोपेड गाडी रजि नंबर MH40 BA 8731 ताजश्री होन्डा नागपूर यांनी श्रीराम फायनांस कंपनी कडून कर्ज मिळवून दिले. सदरहु फायनान्स कंपनीच्या मासीक किस्तीमध्ये दोन वर्षात परत फेडीच्या शर्ती व अटीवर मिळवून दिले होते. सदर २३८१ /- रू. फिर्यादीचे महिन्याचे पंजाब नॅशनल बँक कन्हान येथे सदर मासीक किस्त २३८१/- रु. प्रत्येक महिन्याचे १ ते १० तारीख पर्यंत कपायची फिर्यादीचे गाडीची किस्त ही नियमितपणे कपायची फिर्यादी हा दि. १४/०७/२०२३ रोजी दुपारी ०३.३० वा. ते ०४/०० वा. आपले काम करून नागपूर वरून बसने परत येत असतांना फिर्यादीचे वस्तीतील विक्की उके याचा फिर्यादीला फोन आला की, ५ ते ६ लोक तुझे नाव विचारत होते त्यांच्या वागण्यावरून ते अपराधीक गुन्हेगार असल्याचा संशय आला असल्याने त्याचा पाठलाग केला ते तुझ्या काळया रंगाची अॅक्टीवा गाडीचे हॅन्डलॉक तोडून पसार होताना बगीतले ते कामठी मार्गाने पळाले आहे असा फोन ठेवताच बसने कन्हान कामठी पुलावर दुसऱ्या दुचाकीने ऑटो करून येवून जातांना दिसून आले तसेच फिर्यादी त्वरीत कन्हान नगर परिषद बस स्टॉपवर उतरून ऑटोने पाठलाग केला असता मिळून आले नाही फिर्यादी याला कोणतीही पूर्व सुचना न देता १) शाखा प्रबंधक, श्री राम फायनान्स नागपूर २) सिजर मॅनेजर राम फायनान्स नागपूर ३) तिन अज्ञात आरोपी व अन्य लिप्त आरोपी यांनी फिर्यादी याला नोटीस न देता लुटून नेली फिर्यादीचे गाड़ी मध्ये १००००/-रु. आणि स्टॅम्प पेपर तसेच महत्वपूर्ण दस्तऐवज होते तसेच गाड़ी नेल्याबाबतचे फुटेज महामार्ग ४४ व्या सी सी टी व्ही मध्ये रेकॉर्ड झाले आहे.. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. कन्हान येथे आरोपीतांविरुध्द कलम ३८९ ३९१, ३९५. १२०-B, ५०६, २९४, ३४ भादाव अन्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार खुशाल रामटेके हे करीत आहे