सावनेर :- अंतर्गत मौजा सावनेर हायवे बायपास रोडवर छिंदवाडा पुल २ किमी उत्तर येथे दिनांक २६.०७.२३ चे १३.९५ ते १३.३० वा दरम्यान, फिर्यादी हे मध्यप्रदेश उमरानाला येथुन १६ बक्का ट्रक गाड़ी . एम एच ४० सी डी ५४१० ने आपले सोबत क्लिनर सह केळवद हायवे बायपास छिंदवाड़ा पुलाचे खालून हैद्राबाद येथे जात असतांना यातील आरोपीतांनी फिर्यादीचे ट्रकवर दगड फेकुन अडवुन थांबविली व त्यानंतर गाडीचे समोरील कॅबीनचे काच लाठी व काठीने मारून फोडले. गाडीवर फेकलेल्या दगडामुळे गाडीच्या काचा फुटुन फिर्यादी व क्लिनर साईडने, गाडीने आतमध्ये फिर्यादीचे ताब्यातील रेडमी कंपनीचा जुना वापरता अॅन्ड्राईड मोबाईल किमती ५०००/- रू व पॅन्टचे खिशातील पैशे कि १०५००/- रू असा एकुण १५५००/- रू चा मुद्देमाल घेवुन पळुन गेले.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे- राजेश सुरेशलाल धुर्वे वय ३१ रा उंदरावास कॉलनी गोरेपाट तह मोहखेड जि छिंदवाडा यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपी नामे रोहीत ग्यार रा सरोरा व ईतर साथीदार यांचे विरूद्ध कलम ३४९,३३६,४२७,३९५ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि नागवे हे करीत आहे.