विनयभंग करणा-या आरोपीविरूध्द कारवाई

कळमेश्वर :- अंतर्गत तेलगाव तह कळमेश्वर येथे, फिर्यादी व आरोपी एकाच मोहल्ल्यात राहत असुन फिर्यादीचे घराला लागुन आरोपीचे घर असुन तो परीवारासह राहतो. आरोपी हा दारू पिण्याचा सवईचा असुन फिर्यादीला नेहमी शिवीगाळ करीत असतो. दिनांक २५.०७.२३ २०.०० वा फिर्यादी हे घराचे काम करीत असता, आरोपी अशोक केने फिर्यादीचे घराचे मागच्या दारातुन घरात आला. व फिर्यादीचा जबरदस्तीने हात पकडून ओढताण करून विनयभंग केला. नंतर काही वेळाने आरोपी व त्याचा मुलगा रोशन केने फिर्यादीचे घरासमोर आले व दोघांनी फिर्यादीला व फिर्यादीने पतीला शिवीगाळ करून फिर्यादीचे मुलीला गायब करतो व पतीचा मर्डर करतो. अशी धमकी दिली.

सदर प्रकरणी पिडीता फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पोस्टे कळमेश्वर येथे आरोपी नामे- १. अशोक केने २. रोशन केने दोन्ही रा तेलगाव कळमेश्वर येथे आरोपीविरूध्द कलम ४५२,३५४,३५४ (अ), ५०४, ५०६,३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास स फी / सुनिल मिश्रा हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 64 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Fri Jul 28 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरूवार (27) रोजी शोध पथकाने 64 प्रकरणांची नोंद करून 39900 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com